खोल समुद्रातील खलाशांच्या, जहाजांच्या कितीतरी साहसी कथा ऐकल्या असतील..अगदी कोलंबस, अमेरिगो ते वास्को दी गामा पर्यंत...किनाऱ्यावरून एरवी सुंदर दिसणारा समुद्र खोल समुद्रात गेल्यानंतर किती भयानक असतो, किती आव्हानं असतात याची प्रचिती येते...नजर पडेल तिथपर्यंत पाणीच पाणी.. जमिनीचा थांग पत्ता लागत नसतो...भाईंदर पश्चिमेच्या उत्तन पातान बंदर येथील गॉडविल बोटीवर अडकलेल्या १७ प्रवाशांनीही गेले १० तास अरबी समुद्राचं भयानक रुप पाहिलं...खवळलेल्या समुद्रात बोटीचा पंखा तुटला आणि सुरू झाला जीवन मृत्यूचा थरार...
गेले ८ दिवस पावसाने पुन्हा जोर धरला आहे, त्यामुळे समुद्रही खवळलेला आहे. ऑगस्ट महिन्यात मासेमारीही सुरू झाली आहे. त्यामुळे 'गॉडविल'वरून 17 खलाशी मासेमारीसाठी अरबीसमुद्रात उतरले होते. मात्र आज समुद्रात काहीतरी भयंकर घडणार होतं. याची कोणालाही कल्पना नव्हती. नेहमीप्रमाणे बोल समुद्रात उतरली आणि पुढे सरकायला लागली...काही वेळाने किनाराही दिसेनासा झाला...मच्छिमार मासेमारीसाठी व्यस्त झाले आणि समु्द्रावर काळे ढग दाटू लागले..काहीवेळात काळ्या ढगांनी आकाश झाकोळून गेलं..मच्छिमारांना समुद्र आणि आकाशातील काळा ढगांचा वादळांचा खेळ काही नवा नाही..पण आज वेगळाचं काही तरी घडणार होतं...मच्छिमार मासेमारीत व्यस्त असताना अचानक बोटीचा पंखा तुटला..
वादळ-वारा, मुसळधार पाऊस आणि खोल समुद्रात असताना १७ प्रवाशांवर जीवन मरणाचा प्रसंग ओढवला होता..कोणीतरी मदतीला येण्याची शक्यता कमी होती..कारण हवामान विभागाने आधिच सतर्कतेचा इशारा दिला होता आणि परतीचा प्रवास सुरू असतानाही दुर्घटना घडली होती. भर वादळात समुद्रात बंद पडली होती. कोस्ट गार्ड सह कोणत्याही प्रकारची मदत मिळाली नाही.
मात्र उत्तनमधील एक बोट मदतीला धावली अन् १७ खुलाशांना थोडा जीवात जीव आला. या बोटीला दोरखंडाने गॉडवीलला बांधून बोट समुद्र किणाऱ्यावर आणण्यात आली. १० तासांचा हा थरारक प्रवास होता.या बोटीवर नाखवा सह १६ खलाशी असे एकूण १७ जण अडकले होते.मच्छीमार संस्थेने कोस्टगार्ड,पोलीस,मत्स्य विभागाला कळवले मात्र कोणत्याही प्रकारची मदत मिळाली नव्हती. दरम्यान सर्व खलाशी किनाऱ्यावर पोहोचले असून सुखरूप असल्याची माहिती आहे.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.