'नॅनो प्रकल्प गुजरातमध्ये गेला, तेव्हा...'; वेदांता प्रकल्पावरून सुधीर मुनगंटीवारांचं विरोधकांना प्रत्युत्तर

'नॅनो प्रकल्प गुजरात मध्ये गेला तेव्हा विरोधक का बोलत नव्हते ? असा सवाल मुनगंटीवार यांनी विरोधकांना केला आहे.
sudhir mungantiwar
sudhir mungantiwar saam tv

sudhir mungantiwar News : वेदांता प्रकल्पावरून राज्यातील राजकारण चांगलंच तापलं आहे.वेदांता प्रकल्प गुजरातला गेल्यावरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका केली आहे. सत्ताधाऱ्यांनी देखील विरोधकांवर जोरदार प्रत्यारोप केले आहेत. आता मंत्री सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी देखील वेदांता प्रकल्पावरून विरोधकांवर निशाणा साधला आहे. 'नॅनो प्रकल्प गुजरात मध्ये गेला तेव्हा विरोधक का बोलत नव्हते ? असा सवाल मुनगंटीवार यांनी विरोधकांना केला आहे.

sudhir mungantiwar
बाळासाहेबांनी सत्तेसाठी विचारधारा बदलली नाही; मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंना टोला

मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी विरोधकांवर विविध मुद्द्यांवरून विरोधकांवर टीकास्त्र सोडलं आहे. सुधीर मुनगंटीवार म्हणाले, 'नोकर भरतीमध्ये मागील सरकारच्या काळात भ्रष्ट्राचार झाला. अडीच वर्षे सत्ता होती, तेव्हा विरोधक झोपले होते का ? नॅनो प्रकल्प गुजरातमध्ये गेला, तेव्हा विरोधक का बोलत नव्हते ? लता मंगेशकर, सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) यांच्यावर आरोप केला, पण सचिन वाझेवर विचारले तर ओसामाबीन लादेन आहे का ? असं म्हणतात'.

sudhir mungantiwar
जखमी गोविंदा प्रथमेश सावंतची शिंदे सरकारकडून उपेक्षा; रोहित पवारांनी केली 'ही' मागणी

धारावीच्या पुनर्विकासाबाबत मुनगंटीवार म्हणाले, महाराष्ट्राच्या विकासाशाठी सरकारने धारावी पुनर्विकासाचा निर्णय घेतला आहे. निवडणुकीसाठी नाही.मुंबई जिंकण्याची असेल तर तुम्ही वीस वर्षे काय केले ते बघा. मुंबई रस्त्यांवर खड्डे नाहीत,मुंबई तुंबत नाही हे लोकांना सांगावे.मागच्या सरकारचे दूषित निर्णय होते त्याचा फेरविचार केला जात आहे. ल्या सरकारनेही अनेक कामांना स्थगिती दिली होती. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी आम्हाला वेग वेगळ्या प्रकल्पाचे आराखडे तयार करायला सांगितले आहे'.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com