Shambhuraj Desai: दापोलीकरांना त्रास झाला, तर पोलीस बघत राहणार नाहीत, शंभूराज देसाईंचा सोमय्यांना इशारा

कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल असं त्यांनी वागू नये.
Shambhuraj Desai And Kirit Somaiya
Shambhuraj Desai And Kirit SomaiyaSaam Tv
Published On

भूषण शिंदे

मुंबई: रत्नागिरी (Ratnagiri) जिल्ह्यातील मुरुड समुद्र किनाऱ्यावरील अनिल परब (Anil Parab) यांच्या बेकायदेशीर रिसॉर्टवर हातोडा मारुया, म्हणत माजी खासदार किरीट सोमय्या हे दापोलीच्या दिशेने निघाले आहेत. अनिल परब यांच्या रिसॉर्टवर कारवाईची मागणी सोमय्यांनी केलीये. मात्र, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल असं त्यांनी वागू नये. तिथल्या लोकांना जरा याचा त्रास झाला तर पोलीस बघत राहणार नाहीत, असा थेट इशारा राज्याचे गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी सोमय्यांना दिलाय (Minister Shambhuraj Desai Slams Kirit Somaiya).

Shambhuraj Desai And Kirit Somaiya
Kirit Somaiya Dapoli Visit: दापोलीला छावणीचे स्वरुप, मोठा पोलीस बंदोबस्त तैनात

कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल असं त्यांनी वागू नये - शंभूराज देसाई

"याच्या बाबतीत मी सकाळपासून पाहतोय की, किरीट सोमय्या (Kirit Somaiya) दापोलीला निघाले आहेत. प्रतिकात्मक हातोडा घेऊन गेले आहेत. पण, तिथली सत्य परिस्थिती त्यांनी नीट तपासली का? ते खरंच अनधिकृत आहे का", असा सवाल शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) यांनी उपस्थित केला.

"ते जबाबदार लोकप्रतिनिधी होते. एका राष्ट्रीय पक्षाचे नेते आहेत. त्यांनी महसूल विभागाला कळवावे. मग महसूल विभाग कारवाई करेल ना. पण, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल असं त्यांनी वागू नये. तिथल्या लोकांना जरा याचा त्रास झाला, तर पोलीस बघत राहणार नाहीत. कायदा हातात घेऊ नये. आम्ही तेथील पोलीस प्रशासनाला सांगितले आहे की, जर कायदा हातात घेण्यात आला, तर कायद्याच्या चौकटीत राहून योग्य ती कारवाई करावी", असा इशाराही शंभूराज देसाई यांनी दिला आहे.

समाजात तेढ वाढवण्याचं काम करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे आयुक्तांनी आदेश - राज्यमंत्री

"मोहित कंबोज (Mohit Kamboj Bhartiya) काय म्हणाले मला माहित नाही. पण, आयुक्त हे कायद्याच्या चौकटीत राहूनच काम करतात. शासनाच्या नियमात राहूनच काम करतात. काल मुख्यमंत्री यांनी स्पष्ट केलं आहे की आम्ही हिंदुत्वाशी इंच भर देखील मागे हललेलो नाही. कोव्हिडच्या काळात महाराष्ट्राला बाहेर काढला. चांगलं काम केलं तरी आरोप करायचे. पण, शिवसेनेवर आणि मुंबईकरांवर तिळमात्र फरक पडणार नाही. पुन्हा बीएमसीवर एकहाती सत्ता आमची येणार आहे".

"जरा कोणाच्या वक्तव्यामुळे जरा समाजात तेढ निर्माण झाला. जर संबंधित व्यक्तीची व्हिडीओ क्लिप सापडली किंवा पुरावे सापडले. स्पष्ट झालं की त्यामुळे तेढ वाढला, तर योग्य ती कारवाई करण्याचे आदेश आयुक्तांना दिले आहेत", असं म्हणत त्यांनी भाजप नेते मोहित कंबोज यांच्यावर निशाणा साधला आहे.

Edited By - Nupur Uppal

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com