मुंबई : स्वत:ला सेक्युलर समजणारी लोक एका जातीच्या घटकाबद्दल वक्तव्य करत असतील तर ते वक्तव्य निषेधार्थ असल्याचे वक्तव्य पंचायत राज मंत्री कपिल पाटील राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या ओबीसी समाजाबद्दल केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध केला आहे. केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांनी कल्याण शहरात सुरु असलेल्या स्मार्ट सिटी प्रकल्पाच्या कामाची पाहणी केली यावेळी ते बोलत होते. आव्हाड यांनी OBC समाजावर भरवसा नसल्याचे वक्तव्य करून नवा वाद निर्माण केला असून आज या वक्तव्याबाबत नाराजी आणि निषेध व्यक्त करताना राज्यमंत्री कपिल पाटील यांनी जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) हे उच्चकोटीचे नेते आहेत ,त्याचा ओबीसीवर भरोसा नाही या वाक्याचा अर्थ काय हे माहित नाही.
मात्र त्यांनी संपूर्ण ओबीसी समाजाचा अपमान केला आहे. ते ज्या मतदार संघातून निवडून येतात त्या मतदार संघात देखील ओबीसी मतदार असतील त्यांचा देखील त्यांनी अपमान केला आहे. कोणीही कोणत्याही जाती धर्माला कमी लेखण्याचे कारण नाही. या देशात राहणाऱ्या सर्व जातीचे धर्माचे लोक या देशाच्या हितासाठी संरक्षणासाठी, प्रगतीसाठी, उन्नतीसाठी आपल्याल्या परीने प्रयत्न करत असतात. जात, पात धर्म. पंथ यापेक्षा मानवतेचा धर्म सर्वश्रेष्ठ धर्म आहे. म्हणून स्वत:ला सेक्युलर समजणारी लोक एका जातीबद्दल वक्तव्य करत असतील तर ते निषेधार्ह असल्याचं पाटील (Minister of State Kapil Patil) म्हणाले.
हे देखील पहा -
कल्याण डोंबिवली महापालिका (Kalyan Dombivali Municipal Corporation) क्षेत्रात सुरु असलेली स्मार्ट सिटी प्रकल्पाची कामे अतिशय संथगतीने सुरु असल्याचे सांगत या कामाचा वेग वाढविण्याच्या सूचना त्यांनी पालिका प्रशासनाला दिल्या. तर काळा तलाव सुशोभीकरणाच्या कामाची पाहणी करताना या तलावाचे नाव भगवा तलाव नामकरण केले आहे का? असा खोचक सवाल करत अजूनही काळा तलावच म्हटले जात असल्याचे सांगत शिवसेनेला चिमटा काढला. स्मार्ट सिटी प्रकल्पाचे काम कोरोनामुळे संथगतीने सुरु असून या कामाचा वेग वाढवा, डीपीआरमध्ये नसलेल्या मात्र जनतेच्या हिताच्या गोष्टीचा यात समावेश केला जावा. काळा तलाव परिसरात 5 ते 10 हजार नागरिक जॉगिंग साठी हे वातावरण प्रसन्न करण्याच्या दृष्टीने कामे करा अशा सूचना यावेळी त्यांनी प्रशासनाला केल्या आहेत. केंद्र, राज्य आणि महापालिकेच्या समन्वयातून हि कामे जलदगतीने पूर्ण व्हावीत अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
Edited By - Jagdish Patil
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.