MHT CET साठी नोंदणी करण्याची मुदत वाढवली; असा करा अर्ज

MHT CET 2021 साठी अर्ज करण्यासाठी विद्यार्थ्यांनी mhtcet2021.mahacet.org या वेबसाईटला भेट द्यावी.
MHT CET
MHT CETSaam Tv
Published On

मुंबई: शैक्षणिक वर्ष 2021-22 करिता तंत्रशिक्षण विभागांतर्गत (Department of Technical Education) विविध व्यावसायिक पदवी व पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमासाठी घेण्यात येणाऱ्या सीईटी 2021 (MHT CET) या प्रवेश परीक्षांसाठी अर्ज करण्याची मुदत वाढवून देण्यात आली आहे. ज्या विद्यार्थ्यांनी अजूनही ऑनलाइन अर्ज केलेल्या नाही त्या उमेदवारांसाठी दिनांक 12/08/2021 ते दिनांक 16/08/2021 या कालावधी दरम्यान ऑनलाईन पध्दतीने अर्ज करता येणार आहे.

तसेच या पूर्वी नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांना अर्जामधील दुरूस्ती करण्याची झाल्यास ती दिनांक 14/08/2021 ते 16/08/2021 या कालावधील करता येणार आहे. अधिक माहितीसाठी विद्यार्थ्यांनी http://mahacet.org या संकेतस्थळाला भेट द्यावी, अशी उच्च शिक्षण आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत (Uday Samnat) यानी माहिती दिली आहे.

अर्ज करण्याची प्रोसेस

1. MHT CET 2021 साठी अर्ज करण्यासाठी विद्यार्थ्यांनी mhtcet2021.mahacet.org या वेबसाईटला भेट द्यावी.

2. त्यासाठी MHT CET 2021 registration या नावावर क्लिक करा

3. त्यानंतर सर्व आवश्यक असलेली माहिती काळजीपूर्वक भरा आणि सेव्ह बटन वर क्लिक करुण पुढे जा.

4. MHT CET 2021 application form भरण्यासाठी रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्ड टाकणे अनिवार्य आहे.

5. यानंतर अर्जासाठीची फी ऑनलाईन स्वरुपात भरून सबमीट या बटणावर क्लिक करा.

6. तुम्ही भरलेल्या अर्जाची तुम्ही सेव्ह करुण प्रिटं काढू शकता

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com