पुणे : पुणेकरांनी Pune बघितलेले स्वप्न आता पूर्ण होणार आहे. पुण्यात आज मेट्रोची Metro पहिली चाचणी पार पडली आहे. पुण्यामधील वनाझ Vanaz ते रामवाडी Ramwadi या मेट्रो कॉरिडॉर मधले वनाझ ते आयडियल Ideal कॉलनी या १०० मीटर मार्गावर चाचणी आज पूर्ण झाली आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार, महापौर मुरलीधर मोहोळ, शिवसेना नेत्या निलम गोऱ्हे या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थित राहिली होती. अजित पवारांनी हिरवा झेंडा दाखवला आहे. २०१६ साली पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते पुणे मेट्रोचे भूमिपूजन करण्यात आले होते.
हे देखील पहा-
याआधी ७ जुलै दिवशी वनाज ते रामवाडी या भागाची रात्रीच्या दरम्यान चाचणी घेण्यात आलेली होती. आज कोथरूड ते आयडियल कॉलनी या टप्प्याची चाचणी झाली पूर्ण झाली आहे.
पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी या बद्दल ट्वीट करून माहिती दिली आहे. पुणे मेट्रोच्या टप्प्याची चाचणी आज सकाळी ७ वाजता करण्यात आली आहे. त्यावर संकल्पातून सिद्धीकडे पुणे मेट्रोची आज ट्रायल झाली आहे, अशा प्रकारचे ट्वीट महापौर मुरलीधर मोहोळ यांनी केले होते.
वनाज ते आयडियल कॉलनी दरम्यान मेट्रोची धाव वनाज ते रामवाडी या मेट्रो मार्गिके अंतर्गत वनाज ते आयडियल कॉलनी या टप्प्यात मेट्रोची चाचणी पार पडलेली आहे. ३ डब्यांच्या २ मेट्रो रेल्वेद्वारे ३.५ किलोमीटर अंतरात ही चाचणी घेण्यात आली आहे. मेट्रोकडून याच मार्गावर काही दिवसांअगोदर सरावपूर्व चाचणी घेण्यात आली आहे.
Edited By- Digambar Jadhav
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.