
मेट्रो 2 ब डीएन नगर ते मंडाळे या मेट्रो प्रकल्पाच्या स्थापत्य कामाच्या खर्चात 248 कोटींची वाढ झाल्याने आता खर्च 3304. 83 कोटी झाला असल्याची माहिती आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांस मेट्रो प्रकल्प अंमलबजावणी शाखेने दिली आहे. हा प्रकल्प चार भागात विभाजित असून दिरंगाई बाबत तीनही कंत्राटदारास 1.92 कोटींचा दंड आकारण्यात आला आहे.
◆ डीएन नगर ते बीकेसी एमटीएनएल
डीएन नगर ते बीकेसी एमटीएनएल पॅकेज सी 101 अंतर्गत मे. जे.कुमार इंफ्राप्रोजेक्टस लि. यांस 28 मे 2021 रोजी कार्यादेश देण्यात आले असून काम पूर्ण करण्याची तारीख 27 नोव्हेंबर 2023 अशी होती. सद्या वाढीव मुदतवाढ दिली असून ती तारीख 30 जून 2025 अशी आहे. या कामाचा अपेक्षित खर्च 1307.88 कोटी होता ज्यात 55.54 कोटींची वाढ झाली आहे. मे. जे.कुमार इंफ्राप्रोजेक्टस लि. तर्फे कामात करण्यात आलेल्या दिरंगाईमुळे त्यास 1.36 लाखांचा दंड आकारण्यात आला आहे.
◆ बीकेसी एमटीएनएल ते चेंबूर डायमंड गार्डन
बीकेसी एमटीएनएल ते चेंबूर डायमंड गार्डन पॅकेज सी 102 अंतर्गत मे.एनसीसी लि. यांस 2 मे 2022 रोजी कार्यादेश देण्यात आले असून काम पूर्ण करण्याची तारीख 1 मे 2025 अशी आहे. सद्या वाढीव मुदतवाढ दिली गेली आहे. या कामाचा अपेक्षित खर्च 759.67 कोटी आहे. मे.एनसीसी लि. तर्फे कामात करण्यात आलेल्या दिरंगाईमुळे त्यास 14.99 लाखांचा दंड आकारण्यात आला आहे.
◆ चेंबूर डायमंड गार्डन ते मंडाळे मेट्रो
चेंबूर डायमंड गार्डन ते मंडाळे पॅकेज सीए 7 अंतर्गत मे.एनसीसी लि. यांस 17 जानेवारी 2019 रोजी कार्यादेश देण्यात आले असून काम पूर्ण करण्याची तारीख 16 जुलै 2021 अशी आहे. सद्या वाढीव मुदतवाढ 30 जून 2025 अशी आहे. या कामाचा अपेक्षित खर्च 458.93 कोटी आहे ज्यात वाढीव खर्च हा 122.77 कोटी इतका झाला आहे. मे.एनसीसी लि. तर्फे कामात करण्यात आलेल्या दिरंगाईमुळे त्यास 29.58 लाखांचा दंड आकारण्यात आला आहे.
◆ मंडाळे कारशेड
मेट्रो 2 ब साठी मंडाळे कारशेड पॅकेज सीए 14 अंतर्गत मे. अहलुवालिया इंडिया लिमिटेड यांस 17 जानेवारी 2019 रोजी कार्यादेश देण्यात आले असून काम पूर्ण करण्याची तारीख 16 जुलै 2021 अशी होती. सद्या वाढीव मुदतवाढ दिली असून ती तारीख 30 जून 2025 अशी आहे. या कामाचा अपेक्षित खर्च 530.32 कोटी होता ज्यात 69.68 कोटींची वाढ झाली आहे. मे. अहलुवालिया इंडिया लिमिटेडमे. तर्फे कामात करण्यात आलेल्या दिरंगाईमुळे त्यास 10.97 लाखांचा दंड आकारण्यात आला आहे.
अनिल गलगली यांच्या मते योग्य नियोजन नसल्याने काम वेळेवर पूर्ण होत नाही आणि उलट खर्चात वाढ झालेली आहे. याबाबत भविष्यात सुलभ आणि जलद प्रवाशांसाठी शासनाने नियंत्रण करणे आवश्यक आहे.
◆ अपेक्षित स्थापत्य खर्च 30,56,82,13,795
◆ वाढीव खर्च 2,48,01,10,027
◆ दंडात्मक रक्कम 1,92,49,471
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.