रुपाली बडवे
मुंबई: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे राज्यभरातील जुन्या शिवसैनिकांच्या भेटीगाठी घेत आहेत. आज, गुरुवारी सकाळीच त्यांनी शिवसेनेचे (Shivsena) ज्येष्ठ नेते लीलाधर डाके (Liladhar Dake) यांची भेट घेतली होती. त्यानंतर आज संध्याकाळी त्यांनी शिवसेनेचे ज्येष्ठ नेते मनोहर जोशी (Manohar Joshi) यांची भेट घेतली आहे. या भेटीमागचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही, मात्र पत्रकारांनी विचारल्यावर "आजची भेट ही सदिच्छा भेट होती" असं उत्तर त्यांनी माध्यमांना दिलं आहे. (Eknath Shinde Latest News)
हे देखील पाहा -
शिवसेनेचे ज्येष्ठ नेते मनोहर जोशी हे शिवसेनेचे पहिले मुख्यमंत्री आहेत, तर शिवसेना संस्थापक दिवगंत बाळासाहेब ठाकरेंचे ते अतिशय विश्वासू होते. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी मनोहर जोशींची घेतलेली ही भेट महत्वाची मानली जाते. या भेटीबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, आजची भेट ही सदिच्छा भेट होती. मध्यंतरी त्यांची तब्येत बरी नव्हती, आता मी भेट घेण्यासाठी आलो. बाळासाहेब ठाकरे यांच्या काळात अनेकांनी काम केलं, त्यामुळे त्यांचे आशीर्वाद, शुभेच्छा हे कामी येतील. त्यांनी जाहीर केलेल्या योजनांचं पुस्तक त्यांनी मला भेट केलं, त्या योजना लोकांपर्यंत पोहचविण्याची भावना त्यांनी व्यक्त केली. या भेटीमागे कोणताही राजकीय हेतू नाही. आम्ही त्यांच्या हाताखाली काम केलंय, आम्ही त्यांचे कार्यकर्ते आहोत असं एकनाथ शिंदे म्हणाले आहेत.
मुंबईतील रस्त्यांबाबत म्हणाले की, मुंबईतील रस्ते आणि इतर कामाचा आढावा घेतला आहे. पालिकेतदेखील आयुक्तांशी ४०० किमीचे रस्ते निविदा करण्याबाबत चर्चा केली आहे. मुंबईतील सगळे रस्ते येत्या २ वर्षात सिमेंट काँक्रीटचे असतील, कुठेच तुम्हाला रस्त्यावर खड्डे दिसणार नाही असंही एकनाथ शिंदे म्हणाले आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.