Mumbai : उपमुख्यमंत्र्यांसोबत मराठा क्रांती मोर्चाची बैठक वादळी ठरण्याची शक्यता

Meeting of Maratha Kranti Morcha Latest News : बैठकीत न घेतल्यास मंत्रालयाच्या गेटसमोरच आंदोलन (Protest) करण्याचा इशारा आबासाहेब पाटील यांनी सरकारला दिला आहे.
Meeting of Maratha Kranti Morcha with Deputy Chief Minister will likely to be stormy
Meeting of Maratha Kranti Morcha with Deputy Chief Minister will likely to be stormySaam TV
Published On

रुपाली बडवे

मुंबई: मराठा समाजाच्या (Maratha Community) विविध मागण्यांबाबत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी आज (मंगळवारी) ३ः४५ वाजता बैठक (Meeting) बोलवली आहे. ही बैठक मंत्रालयात होणार आहे. मात्र ही बैठक वादाची ठरण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मराठा क्रांती ठोक मोर्चाचे नेते आबासाहेब पाटील (Maratha Abbasaheb Patil) यांनी सरकारला सर्वा मराठा नेत्यांना बैठकीत घेण्याचं आवाहन केलं आहे. बैठकीत न घेतल्यास मंत्रालयाच्या गेटसमोरच आंदोलन (Protest) करण्याचा इशारा आबासाहेब पाटील यांनी सरकारला दिला आहे. याबाबत त्यांनी एक फेसबुक पोस्ट लिहीली आहे, त्यात त्यांनी हा जाहिर इशारा दिला आहे. (Meeting of Maratha Kranti Morcha with Deputy Chief Minister will likely to be stormy)

हे देखील पाहा -

सर्वांनी उपस्थित राहाण्याचं आवाहन

मराठा समाजाचे नेते आबासाहेब पाटील यांनी फेसबुकद्वारे पोस्ट लिहीत आवाहन केलं की, "मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पुणेसह राज्यातील सर्व मराठा समन्वयकांनी दुपारी ३ वाजेपर्यंत मंत्रालय गार्डन गेटवर उपस्थित राहावे. मराठा समाजाची बैठक सर्व समन्वयक, सर्व मराठा संघटनाना घेऊन झाली पाहिजे यासाठी सर्वांनी उपस्थित राहावे" असं आवाहन आबासाहेब पाटील यांनी मराठा नेत्यांना केलं आहे.

अन्यथा संघर्ष अटळ

ही बैठक सर्वांना सोबत घेऊन करण्यात यावी अशी विनंती आबासाहेब यांनी केली आहे. अन्यथा आज तिथेच आंदोलन सुरू करण्यात येईल. यातून कायदा सुव्यवस्था बिघाल्यास सर्वस्वी जबाबदारी राज्य सरकारची राहील, अन्यथा संघर्ष अटळ आहे असा इशारा त्यांनी सरकारला दिला आहे. त्याचप्रमाणे आघाडी सरकारकडून मराठा आरक्षण आणि इतर मागण्यांसाठी समन्वयकांमध्ये वेगवेगळ्या बैठका लावून गट पडण्याचा प्रयत्न करत आहे असा आरोपही त्यांनी सरकारवर केला आहे.

Meeting of Maratha Kranti Morcha with Deputy Chief Minister will likely to be stormy
बाप-लेकाच्या खून प्रकरणात अनेक धक्कादायक खुलासे; आरोपींविरोधात १२०० पानांचे दोषारोप पत्र

आजच्या बैठकीत या मुद्द्यांवर होणार चर्चा

१) सारथी vision document तयार करणेबात.

२) सारथी मार्फत कौशल्य विकासाचे कार्यक्रम सुरु करणेबाबत.

३) सारथीकडील विभागीय उप केंद्राची २७३ पदे भरणेबाबत.

४) सारथीच्या विभागीय उप केंद्रासाठी जमीन उपलब्ध करून देण्याबाबत.

५) Credit Guarantee बाबत धोरणात्मक निर्णय.

६) अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळास निधी

6) व्याज परताव्याच्या कर्जाची रक्कम रु. १० लाखावरून रु. १५ लाख वाढविणेबाबत.

इत्यादी विषयांवर आजच्या बैठकीक चर्चा होणार आहे.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com