Mumbai: मीनाताई ठाकरे यांचा आज २६ वा स्मृतिदिन; उद्धव ठाकरेंनी वाहिली आदरांजली

Uddhav Thackeray Latest News : यानिमित्ताने माजी सभागृह नेत्या विशाखा राऊत यांनी देखील या ठिकाणी येऊन अभिवादन केले.
Uddhav Thackeray Pays Tribute Meenatai Thackeray
Uddhav Thackeray Pays Tribute Meenatai ThackeraySaam TV

निवृत्ती बाबर

मुंबई: आज, ६ सप्टेंबरला दिवंगत मीनाताई ठाकरे (Meenatai Thackeray) यांचा २६ वा, स्मृतीदिन आहे. यानिमित्त शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) मीनाताई ठाकरे यांना अभिवादन करण्यासाठी दादरमधील शिवाजी पार्क येथे पोहचले आहेत. शिवाजी पार्क येथे त्यांच्या स्मारकाला अभिवादन करण्यासाठी, रश्मी ठाकरे, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारीही येणार आहेत. या ठिकाणी मीनाताई यांना आदरांजली वाहण्यासाठी, भक्तिगीतांचे आयोजन करण्यात आले आहे. (Uddhav Thackeray Latest News)

Uddhav Thackeray Pays Tribute Meenatai Thackeray
Underworld: देशातील चोरीच्या मोबाईल्सचा डी कंपनीकडून दहशतवादासाठी वापर; गुप्तचर संस्थेचा मोठा खुलासा

यानिमित्ताने माजी सभागृह नेत्या विशाखा राऊत यांनी देखील या ठिकाणी येऊन अभिवादन केले. यावेळी विशाखा राऊत यांनी आठवणींना उजाळा दिला. आम्ही कुटुंब म्हणून या ठिकाणी दरवर्षी येतो. यावेळेस कुटुंबातील काही गेले आहेत. दसरा मेळावा हा आमचाच होणार. पहिला अर्ज करतो त्याला परवानगी दिली जाते. ते झोपेतून उशिरा जागे झालेत तर देव त्यांच भलं करो अशा विशाखा राऊत म्हणाल्या.

Uddhav Thackeray Pays Tribute Meenatai Thackeray
मोठी बातमी! शिंदे गटाची पुन्हा एकदा सुप्रीम कोर्टात धाव; काय आहे प्रकरण?

शिवसेनेचा (Shivsena) दसरा मेळावा दरवर्षी याच शिवाजी पार्क मैदानावर होतो. शिवसेनेत फूट पडल्यानंतर यावेळी दसरा मेळाव्याला विशेष महत्व प्राप्त झाले आहे. या मैदानात दसरा मेळावा घेण्यासाठी शिंदे गटही आग्रही आहे, तर शिवसेना स्थापन झाल्यापासून परंपरेनुसार शिवसेनेचे पक्षप्रमुख याठिकाणी मेळावा घेत असतात. त्यामुळे यंदा दसरा मेळाव्यावरुन शिवसेना आणि शिंदे गट यांच्यात चांगलीच जुंपली आहे.

Edited By - Akshay Baisane

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com