नवी मुंबईत विवाहितेने 5 वर्षीय मुलासह इमारतीवरुन मारली उडी, धक्कादायक कारण आलं समोर; पतीला अटक

आरती विजेंद्र मल्होत्रा असं मृत महिलेचं नाव आहे. तर अरवीक असं गंभीर जखमी मुलाचं नाव आहे.
Navi Mumbai
Navi MumbaiSaam TV

>> सिद्धेश म्हात्रे

नवी मुंबई : सासरकडील मंडळीच्या जाचाला कंटाळून एका विवाहितेने आपल्या 5 वर्षीय मुलासह सातव्या मजल्यावरुन उडी टाकून आत्महत्या केली आहे. नवी मुंबईच्या कोपरखैरणेमध्ये ही घटना उघडकीस आली आहे. घटनेत महिलेचा मृत्यू झाला आहे, तर मुलगा गंभीर जखमी आहे.

आरती विजेंद्र मल्होत्रा असं मृत महिलेचं नाव आहे. तर अरवीक असं गंभीर जखमी मुलाचं नाव आहे. अरवीकवर सध्या खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या घटनेनंतर कोपरखैरणे पोलिसांनी मृत विवाहितेच्या पतीसह सासू आणि नणंदेविरोधात छळवणुकीसह आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. (Mumbai Police

Navi Mumbai
Korean Vlogger Harassment : कोरियन तरुणीचा विनयभंग करणाऱ्या आरोपींना जामीन मंजूर

पोलिसांना या प्रकरणी मृत महिलेच्या पतीला अटक केली आहे. जानेवारी 2016 मध्ये आरतीचा विवाह विंजेंद्र याच्याशी झाला होता. ऑनलाईन मॅट्रिमोनी साईटवरुन हे दोघे एकमेकांना भेटले होते, त्यानंतर त्यांचा विवाह झाला होता. (Latest Marathi News)

लग्नानंतर आरती पती सासू-सासरे व नणंद या सर्वांसह कोपरखैरणे सेक्टर-20 मधील श्री रावेची अपार्टमेंटमध्ये सातव्या मजल्यावर राहत होती. लग्नाच्या काही दिवसांनंतर सासरकडील मंडळीनी तिचा शारीरिक व मानसिक छळ करण्यास सुरुवात केली.

Navi Mumbai
NCP Leader Arrested : तलावरींसह राष्ट्रवादीचा पदाधिकारी, चाैघे युवक अटकेत

सोमवारी सासू आणि नणंदने आरतीला तिच्या मुलापासून दूर ठेऊन घराबाहेर जाण्यास सांगितले. यामुळे आरतीने हे टोकाचे पाऊल उचलले असल्याची तक्रार आरतीच्या भावाने कोपरखैरणे पोलीस ठाण्यात केली आहे. या तक्रारीनंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करत पतीला अटक केली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com