Korean Vlogger Harassment : कोरियन तरुणीचा विनयभंग करणाऱ्या आरोपींना जामीन मंजूर

मोबीन चांद मोहम्मद (19) आणि मोहम्मद नकीब अन्सारी (20) यांची तुरुंगातून सुटका झाली आहे.
Mumbai Korean Women Viral Video
Mumbai Korean Women Viral Video Saam TV

मुंबई : मुंबईत एका कोरियन तरुणीचा दोन टवाळखोरांनी काही दिवसांपूर्वी विनयभंग केला होता. या संतापजनक घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर मुंबई पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली होती. या दोन्ही आरोपींची आज जामिनावर सुटका झाली आहे.

कोरियन महिलेच्या विनयभंग प्रकरणातील दोन्ही आरोपींना वांद्रे महानगर दंडाधिकारी न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. मोबीन चांद मोहम्मद (19) आणि मोहम्मद नकीब अन्सारी (20) यांची तुरुंगातून सुटका झाली आहे. (Mumbai Police

Mumbai Korean Women Viral Video
Bribe : पाेलिस दलात उडाली खळबळ; सहाय्यक पोलिस निरीक्षकाला लाच घेताना पकडले

दोन्ही आरोपींना 15-15 हजारांचा जामीन मंजूर करण्यात आला. मात्र या प्रकरणातील आरोपपत्र दाखल होईपर्यंत न्यायालयाने दोन्ही आरोपींना दर मंगळवारी खार पोलीस ठाण्यात हजर राहण्याचे निर्देश दिले आहे. (Latest Marathi News)

Mumbai Korean Women Viral Video
NCP Leader Arrested : तलावरींसह राष्ट्रवादीचा पदाधिकारी, चाैघे युवक अटकेत

नेमकं काय घडलं होतं?

मुंबईत काही स्थानिक तरुणांनी भर रस्त्यात एका कोरियन तरुणीची छेड काढली होती. बुधवारी 30 नोव्हेंबर रोजी रात्री ही संतापजनक घटना घडली होती. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. व्हिडीओ समोर येताच, मुंबईकरांनी संताप व्यक्त केला होता. त्यांना पोलिसांनी या दोन्ही आरोपींना अटक केली होती.

पीडित तरुणी ही युट्यूबर असून ती दक्षिण कोरियाची नागरिक आहे. एका तरुणाने मुंबई पोलिसांना टॅग करून हा व्हिडीओ ट्वीट केला होता. व्हिडीओ समोर येताच, पोलिसांनी या घटनेची गंभीर दखल घेतली.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com