Maratha Reservation : मुख्यमंत्री फडणवीसांच्या दौऱ्याआधी कारवाई; मराठा आंदोलक पोलिसांच्या ताब्यात

Maratha Reservation update : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या दौऱ्याआधी पोलिसांनी मोठी कारवाई केली. पुण्यात मराठा आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.
Maratha Reservation update
Maratha Reservation Saam tv
Published On
Summary

मुख्यमंत्री फडणवीस यांच्या पुणे दौऱ्याआधी मराठा आंदोलक पोलिसांच्या ताब्यात

सिंहगड रोडवरील उड्डाणपुलाचं मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन

पोलिस आयुक्त अमितेश कुमारांकडून स्वतः रस्त्यावर उतरून सुरक्षा पाहणी

पुण्यात गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरात कडेकोट बंदोबस्त

पुणे : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या आझाद मैदानातील उपोषणामुळे राज्यभरात वातावरण तापलं आहे. मराठा आरक्षण आंदोलनामुळे राज्यातील विविध भागात आंदोलकांकडून आक्रमक भूमिका घेतल्या जात आहेत. जरांगे यांच्या उपोषणाचा परिणाम पुण्यातही पाहायला मिळाला. मुख्यमंत्री फडणवीसांच्या पुण्यातील दौऱ्याआधी पुण्यातील मराठा आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं.

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुणे दौऱ्यावर आहेत. पुण्यातील सिंहगड रोड उड्डाणपुलाच्या लोकार्पण कार्यक्रमाला मुख्यमंत्री फडणवीस उपस्थित राहणार आहेत. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुणे दौऱ्यादरम्यान अनेक मंडळांच्या गणेश मूर्तींचं दर्शन घेण्याची शक्यता आहे.

Maratha Reservation update
ManoJ Jarange Patil : एकतर विजयी यात्रा,नाहीतर अंत्ययात्रा निघेल; मनोज जरांगेंची आंदोलकांना साद

दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर पुण्यात पोलिसांचा मोठा बंदोबस्त पाहायला मिळत आहे. दुसरीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर काही मराठा आंदोलक कार्यक्रमाच्या रस्त्यार जमले होते. या आंदोलकांना पुणे पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

Maratha Reservation update
Jamnagar Tragedy : गणेश मूर्तीचं विसर्जन करताना पाण्याचा अंदाज चुकला; एकाच कुटुंबातील तिघांचा बुडून मृत्यू

पुण्यातील सिंहगड रोड उड्डाणपुलाच्या लोकार्पण कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर स्वतः पोलीस आयुक्त अमितेश कुमार रस्त्यावर उतरले आहेत. सिंहगड रस्त्याकडून राजाराम पुलाच्या दिशेने जाणाऱ्या रस्त्यावर पोलिसांचा चोख बंदोबस्त पाहायला मिळत आहे. याच लोकार्पण कार्यक्रमाच्या जवळ असलेल्या ठिकाणाहून काही आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं.

कोणत्या पुलाचं होणार उद्घाटन?

पुण्यातील सिंहगड रोडवरील पुलाचं आज उद्घाटन होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सिंहगड रोडवरील उद्यान पुलाचं उद्घाटन होणार आहे. पुण्यातील सर्वात मोठा उड्डाणपुल वाहतुकीसाठी आजपासून खुला होणार आहे. फनटाईम थिएटर ते विठ्ठलवाडी या मार्गावरील २.५ किलोमीटर उड्डाणपूलाचं उद्घाटन होणार आहे. या उद्घाटनाला केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांची देखील उपस्थिती असणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com