अँटिलिया स्फोटक प्रकरणी (Antilia Explosive Case) आणि मनसुख हिरेन हत्या (Mansukh Hiren murder) प्रकरणात NIA ने अटक केलेल्या सचिन वाझे, रियाझ काझी, विनायक शिंदे, सुनील माने, नरेश गोर, सतीश मोठेकरी या आरोपींची न्यायालयीन कोठडीत वाढ करण्यात आली आहे. सर्व आरोपींची न्यायालयीन कोठडी 14 दिवस म्हणजेच 2 ऑगस्टपर्यंत वाढवण्याचा आदेश न्यायालयाने दिला आहे. उच्च न्यायलयाचे न्यायमूर्ती प्रशांत सित्रे यांनी सर्व आरोपींच्या न्यायालयीन कोठडीत वाढ केली. (Mansukh Hiren murder: Accused's custody extended after 14 days)
दरम्यान, मनसुख हिरेन हत्या प्रकरणातील NIA कडून अटक करण्यात आलेला आणि सध्या न्यायालयीन कोठडीत असलेला आरोपी विनायक शिंदे याने जामिनासाठी NIA कोर्टात अर्ज केला होता. मात्र या जामीन अर्जावर आज सुनावणी झाली नाही. शिंदेच्या न्यायालयीन कोठडीत 2 ऑगस्टपर्यंत वाढ करण्यात आली आहे.
Edited By- Anuradha
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.