Dombivli : मानपाडा, डोंबिवली, रामनगर, विष्णुनगर, मिरा रोडला चाेरी करणारा अटकेत; १२ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

संशयित चाेरटा हा मूळचा कर्नाटकचा आहे.
Dombivli, manpada police
Dombivli, manpada policesaam tv
Published On

- अभिजित देशमुख

Dombivli : भरदिवसा घरफोड्या करणाऱ्या सराईत चोरट्याला मानपाडा पोलिसांनी (manpada police) अटक केली आहे. या चाेरट्यांकडून डोंबिवलीतील (Dombivli) तब्बल दहा गुन्ह्यांची उकल करण्यात पाेलिसांना यश आले आहे. संशयिताकडून पाेलिसांनी वीस तोळे सोने, चांदीचे दागिने तसेच रक्कम असा एकूण बारा लाखांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.

Dombivli, manpada police
Shirol : पावणे दाेन लाखाच्या लाच प्रकरणी शिरोळचे मुख्याधिकारी, अभियंता, लिपिक ACB च्या जाळ्यात (पाहा व्हिडिओ)

वॉचमन नसलेल्या इमारती मधील बंद घरे हेरून भरदिवसा घरफोडी करत लाखोंचे दागिने चोरणाऱ्या चोरट्याला मानपाडा पोलिसांनी अटक केली आहे. शंकर सुर्यवंशी असे या चोरट्याचे नाव आहे. त्याच्या विरोधात मिरारोड , डोंबिवली मधील विष्णुनगर रामनगर ,मानपाडा पोलीस ठाण्यात घरफोडीचे एकूण दहा गुन्हे दाखल आहेत.

शंकरने आणखी काही घर पुढे केल्याचा संशय पोलिसांना असून पोलीस त्यादृष्टीने तपास करत आहेत .त्याच्याकडून पोलिसांनी वीस तोळे सोन्याच्या चांदीचे दागिने रोकड असा एकूण बारा लाखांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. (Maharashtra News)

Dombivli, manpada police
Amravati : नाफेड खरेदी केंद्रात गाेंधळ, पाेलिसांचा शेतक-यांवर लाठीचार्ज; नांदगाव खंडेश्वरात तणाव

डोंबिवली पूर्व पश्चिम परिसरात दिवसा घरफोडी होण्याचे प्रमाण वाढले होते. या चोरट्यांचा शोध घेण्यासाठी डीसीपी सचिन गुंजाळ, एसीपी सुनील कुराडे यांच्या मार्गदर्शनाखाली मानपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शेखर बागडे ,सहाय्यक पोलीस निरीक्षक अविनाश वनवे, सुनील तारमळे ,भानुदास काटकर यांचे पथक नेमले.

या पथकाने चोरट्याचा शोध सुरू केला. तपासादरम्यान या पथकाने कल्याण पूर्वेकडील द्वारली परिसरातून शंकर सुर्यवंशी या चोरट्याला ताब्यात घेतलं. त्याची चौकशी दरम्यान त्याने मानपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत ,डोंबिवली पोलीस ठाणे ,विष्णू नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत आपल्या साथीदाराच्या मदतीने तब्बल दहा घरफोडीचे गुन्हे केल्याचे उघडकीस आले.

Dombivli, manpada police
Nashik : नाशकात जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनात शेतकरी घुसले, ठिय्या मांडत कांदा भाकर आंदाेलनास प्रारंभ

या गुन्ह्यात त्याने चोरलेला २० तोळे सोन्या, चांदीचे दागिने व रोकड असा १२ लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले. शंकर सूर्यवंशी हा मूळचा कर्नाटकचा असून तो सध्या कल्याण जवळील द्वारली गावात राहत होता.

आपल्या साथीदाराच्या मदतीने शंकर दिवसा वॉचमन नसलेल्या इमारत शोधायचा. या इमारतीमधील बंद घरं हेरून घराचे कुलूप स्क्रू ड्रायव्हरच्या सहाय्याने तोडून घरफोडी करत होता. त्याच्याविरोधात मानपाडा, डोंबिवली रामनगर ,विष्णुनगर पोलीस ठाणेसह मिरा रोड (mira road) येथील पोलीस ठाण्यात देखील गुन्हे दाखल असल्याची माहिती सचिन गुंजाळ यांनी दिली.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com