डोंबिवली : डोंबिवलीत दिवसेंदिवस चोरीच्या घटना (Robbery cases) वाढत असतानाच आता पुन्हा एकदा चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे. डोंबिवलीच्या टीळक नगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत १०० तोळे सोने चोरी (Dombivali Gold Robbery) झाल्याची घटना ३१ मे रोजी घडली होती. त्यानंतर मनापाडा पोलिसांनी तातडीनं तपास मोहीम सुरु करुन आरोपीच्या मुसक्या आवळल्या. याप्रकरणी पोलिसांनी भायखळा कामाठीपुरा येथून चोरट्याला अटक (Thief Arrested) केली असून त्याच्याकडून ७१२ ग्रॅम वजनाचे दागिने हस्तगत केले. अभिजित रॉय असं अटक केलेल्या अट्टल गुन्हेगाराचे नाव आहे. तसेच चोरीच्या गुन्ह्यात आरोपी इम्रान खान आणि रियाज खानलाही पोलिसांनी अटक केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, डोंबिवलीत राहणारे अमित झोपे काही कामानिमित्त ३१ मे रोजी पुणे यथे गेले होते. त्यावेळी त्यांच्या घराला कुलूप असल्याने आरोपी अभिजित रॉय याने संधीचा फायदा घेत स्क्रूड्राइव्हरच्या साहाय्याने कुलूप तोडून घरात प्रवेश केला. त्यानंतर चोरट्याने कपाटातील १०० तोळे दागिने चोरून पळ काढला.या संदर्भातील तक्रार अमित झोपे यांनी टिळकनगर पोलीस ठाण्यात दाखल केली होती.
या चोरीच्या प्रकरणाचा छडा लावण्यासाठी डोंबिवलीचे सहायक आयुक्त सुनील कुराडे आणि मानपाडा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शेखर बागडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक बाळासाहेब पवार,सहायक पोलीस निरीक्षक अविनाश वणवे,सहायक पोलीस निरीक्षक सुनील तारमळे यांच्यापथकाने सीसीटीव्हीच्या साहायाने आरोपीचा तपास सुरू केला.
त्यानंतर पोलिसांच्या पथकाने आरोपी अभिजित रॉयला भायखळा कामाठीपुरा येथून अटक केली. आरोपीकडून चोरी केलेल्या दागिन्यांपैकी ७१२ ग्रॅम सोने आणि २५८ ग्रॅम चांदीचे दागिने असा ३६ लाख ६० हजराचा किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.आरोपी हा मुबंईहून लोकल ने प्रवास करून यायचा आणि वॉचमन नसलेल्या इमारतींना लक्ष करत असे.
तसेच अटक केलेला आरोपी हा सोन्याचे दागिने गाळण्याचे काम करत असून त्यात त्याला नुकसान झाले असल्याने घरफोडी करण्याचा मार्ग स्वीकारत नुकसान भरून काढण्याचा प्रयत्न तो करत होता, अशी माहिती पोलीस तपासात उघड झाली आहे. आरोपी अभिजित रॉय याच्यावर डोंबिवलीतील ६ घरफोडी चे गुन्हे दाखल आहे. तर इम्रान खान आणि रियाज खान यांच्यावर ४ घरफोडीचे गुन्हे दाखल असल्याची माहिती कल्याण परिमंडळ -३चे पोलीस उपायुक्त सचिन गुंजाळ यांनी दिली आहे.
Edited By - Naresh Shende
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.