मनोज आव्हाड हत्या प्रकरण, RPIचा पुणे जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा

मनोज आव्हाड हत्या प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून मनोज आव्हाड च्या मारेकऱ्यांना फाशी द्या, अशी अशी मागणी यावेळी आरपीआयच्या कार्यकर्त्यांनी केली.
मनोज आव्हाड हत्या प्रकरण, RPIचा पुणे जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा
मनोज आव्हाड हत्या प्रकरण, RPIचा पुणे जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चाSaamTvNews
Published On

पुणे : औरंगाबाद येथे २१ एप्रिल रोजी मनोज आव्हाड (Manoj Awhad) या मातंग समाजातील तरुणाची अत्यंत निर्दयीपणे हत्या करण्यात आली. या हत्येच्या निषेधार्थ, आज रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया मातंग आघाडीच्या वतीने पुणे जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला.

हे देखील पाहा :

हातात निषेधाचे फलक घेऊन, तसेच मनोज आव्हाडच्या मारेकऱ्यांविरोधात जोरदार घोषणाबाजी करून आरपीआयच्या कार्यकर्त्यांनी हा मोर्चा काढला. मनोज आव्हाड हत्या प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून मनोज आव्हाड च्या मारेकऱ्यांना फाशी द्या, अशी अशी मागणी यावेळी आरपीआयच्या कार्यकर्त्यांनी केली. त्याच बरोबर मनोज आव्हाड हत्या प्रकरणाची दखल न घेतल्याच्या आरोपावरून यावेळी आरपीआयच्या वतीने महाविकास आघाडी सरकारचा निषेध करण्यात आला. तसेच सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी देखील आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी यावेळी आंदोलकांनी केली.

मनोज आव्हाड हत्या प्रकरण, RPIचा पुणे जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा
दोनशे कोटींच्या आरोपाचे 'ते' व्हायरल पत्र केवळ बदनामीसाठी : कृष्ण प्रकाश

आरपीआय आठवले गट, मातंग आघाडी प्रदेशाध्यक्ष हनुमंत साठे, आरपीआय पुणे शहर अध्यक्ष शैलेंद्रभाऊ चव्हाण, आरपीआय नेते परशुराम वाडेकर, बाळासाहेब जानराव आणि आरपीआयचे ज्येष्ठ नेते अंकल सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली पुणे जिल्हाधिकारी कार्यालयावर हा धडक मोर्चा काढण्यात आला होता.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com