चारित्र्याच्या संशयावरून 70 वर्षीय पत्नीची हत्या; मालाड येथील घटना

या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे
Malad Crime News
Malad Crime News Saam TV

मुंबई - मालाड येथील मालवणी परिसरात एक संतापजनक घटना घडली आहे. चारित्र्यावर संशय घेत 75 वर्षीय वृद्ध पतीने 70 वर्षीय पत्नीची हत्या केली. त्यानंतर खुद्द आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. ही घटना शुक्रवारी सायंकाळी 5.30 वाजताच्या सुमारास घडली आहे. समरुद्दीन शेख असे या पतीचे नाव असून पत्नीचे नाव मुमताज शेख आहे.

हे देखील पाहा -

मालवणीच्या गेट नं 2, शिवाजीनगर, तेलगु चर्च परिसरात शेख कुटुंबिय रहात होते. शेख हे मृत पत्नी मुमताज शेख हिच्या चारित्र्यावर संशय घेत होते. याच कारणावरून 6 मे च्या रात्री पती समरुद्दीन चांद शेख यांचे पत्नी सोबत वाद झाले. याच वादात राग अनावर झालेल्या समरुद्दीन शेख यांनी चाकूने पत्नीवर हल्ला करत तिची हत्या केली. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.

Malad Crime News
आधी वेश्याव्यवसायात ढकलले, नंतर जबरदस्तीने विवाह लावला...

समरुद्दीन मजूर म्हणून काम करत होते. पण गेल्या 10 वर्षांपासून ते कामावर नव्हते. मुमताज जवळच्या शाळेत स्वच्छता कर्मचारी होती. वडिलांना आईच्या चारित्र्यावर संशय असल्याने गेल्या तीन महिन्यांपासून त्याचे आई-वडील सतत एकमेकांशी भांडत होते अशी माहिती तक्रारदार रफिक शेख यांनी दिली आहे. रफिक शेख याने पोलिसांना दिलेल्या महतीनुसार, आई बाजारात गेल्यावर तिला कोणीतरी भेटत आहे असे समजून वडील तिचा पाठलाग करायचे. रफिक शेखच्या तक्रारीच्या आधारे मालवणी पोलिसांनी वडिलांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

Edited By - Shivani Tichkule

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com