Rumors Bomb in Dadar Railway Station : दादर रेल्वे स्टेशनमध्ये बॉम्ब असल्याची अफवा पसरवणारा एकजण ताब्यात, पुण्यातील लोणी काळभोळ परिसरातील घटना

Pune Crime News : योगेश शिवाजी ढेरे असं ताब्यात घेण्यात आलेल्या तरुणाचं नाव आहे.
pune loni kalbhor police station
pune loni kalbhor police station Saam tv

Pune News : दादर रेल्वे स्टेशनवर बॉम्ब आहे अशी अफवा पसरवणाऱ्या तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. हा तरुण मनोरुग्ण असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. लोणी काळभोर पोलिसांनी या तरुणाला ताब्यात घेतलं आहे.

योगेश शिवाजी ढेरे असं ताब्यात घेण्यात आलेल्या तरुणाचं नाव आहे. रविवारी लोणी काळभोर परिसरात गस्त घालत असताना सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास लोणी काळभोर येथील एका हॉटेलजवळ एकजण थांबला असून तो सांगत आहे की, दादर जंक्शन रेल्वे स्टेशनमध्ये बॉम्ब आहे. हा कॉलर लोणी काळभोर हद्दी मधलाच आहे, अशी माहिती पोलिसांना मिळाली. (Maharashtra News)

pune loni kalbhor police station
Tomato Farmer Success Story : टोमॅटो विकून कमावले २.८ कोटी, पुण्याच्या शेतकऱ्याची देशभर चर्चा

घटनेचं गांभीर्य लक्षात घेत पोलिसांनी  त्याठिकाणी धाव घेतली. योगेश ढेरे हा तेथेच हॉटेलच्या बाहेर सापडला. त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता लोकांमध्ये घबराट निर्माण होऊन पळापळ होईल आणि चेंगराचेंगरीमध्ये जीवितहानी व्हावी या उद्देशाने पोलिसांना खोटी माहिती दिल्याचे त्याने कबूल केलं. योगेश हा मनोरुग्ण असल्याचं पोलिसांनी स्पष्ट केलं आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com