राज्य पोलीस दलात मोठे फेरबदल; 'आयर्नमॅन' कृष्णप्रकाश यांची बदली

नाशिकचे वादग्रस्त पोलीस आयुक्त दीपक पांडे यांची अखेर बदली करण्यात आली आहे.
Krishna Prakash | Deepak Pandey
Krishna Prakash | Deepak PandeySaamTvNews
Published On

पुणे : राज्याच्या गृहविभागाच्या आदेशानुसार आज राज्य पोलीस (Police) दलात आज मोठे फेरबदल करण्यात आले आहेत. राज्यातील एकूण २२ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. नाशिकचे (Nashik) वादग्रस्त पोलीस आयुक्त दीपक पांडे (Deepak Pande) यांची अखेर बदली करण्यात आली आहे. दीपक पांडे यांनी राज्याच्या महसूल खात्याविरोधात पत्र लिहिले होते. त्यांना आता नाशिक वरून मुंबईत (Mumbai) महिला अत्याचार प्रबंधक विभागात विशेष पोलीस महानिरीक्षक पदावर नियुक्त करण्यात आले आहे. हेल्मेटसक्ती, नारायण राणे गुन्हा, शहरातील राजकीय पक्षांचे होर्डिंग्ज, भोंग्यांच्या परवानगी यासोबतच अन्य निर्णयांमुळे पांडे चर्चेत होते. तर, सध्या पोलीस उपमहानिरीक्षक व्हीआयपी सुरक्षा, मुंबई या पदावर कार्यरत असणारे जयंत नाईकनवरे नाशिकचे नवे पोलीस आयुक्त बनले आहेत. (Police Transfer News)

पिंपरी-चिंचवडचे (Pimpri Chinchwad) सध्याचे पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश (Krishna Prakash) यांची विशेष पोलिस महानिरीक्षक व्हीआयपी सुरक्षा विभागाच्या विशेष पोलीस महासंचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तर, मुंबईचे विशेष सुधार सेवेचे पोलीस महासंचालक अंकुश शिंदे यांची पिंपरी-चिंचवडचे नवे पोलिस आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com