Pune Accident News: पुण्यातील उंड्री चौकात भीषण अपघात, भरधाव गाडीची 5-6 गाड्यांना जोरदार धडक; दोघांचा मृत्यू

Pune Accident News: मोहम्मदवाडी परिसरात अपघात झाल्याने मोठी वाहतूक कोंडी पाहायल मिळत आहे.
Pune Accident News
Pune Accident NewsSaam TV

Pune Accident News: पुण्यातील उंड्री चौकात भीषण अपघात झाला आहे. ब्रेक फेल झालेल्या गाडीने ५ ते ६ गाड्यांना जोरदार धडक दिली. या अपघातात २ जणांचा मृत्यू झाला आहे तर चार जण जखमी झाले आहेत.

तीव्र उतारावर हा अपघात झाला आहे. मोहम्मदवाडी परिसरात अपघात झाल्याने मोठी वाहतूक कोंडी पाहायल मिळत आहे. कोंढवा पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून अपघातातील जखमींना खाजगी रुग्णालयात उपचारासाठी पाठवण्यात आलं आहे. (Accident News)

Pune Accident News
AI Smart Traffic Signal: पिंपरी चिंचवडच्या तरुणाची कमाल, वाहतूक कोंडीवर काढला तोडगा; AI स्मार्ट सिग्नल केला तयार

अपघाताचे काही फोटो देखील समोर आले आहेत. फोटोंवरुन अंदाज लावला जाऊ शकतो की ही धडकी किती जोरदार होती. अनेक गाड्याचा अक्षरश: चुराडा झाला आहे. एक रिक्षा उलटली आहे. तर फुटपाथवरील काही दुकानांचंही नुकसान झालं आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com