Mumbai News: भिवंडीत मोठी दुर्घटना; दोन मजली इमारत कोसळून एकाचा मृत्यू

पहाटेच्या सुमारास परिसरातील एक जुनी दोन मजली इमारत कोसळली.
Mumbai News
Mumbai NewsFayyaj Shaikh

फय्याज शेख

Mumbai News: भिवंडी शहरलगतच्या खोणी ग्रामपंचायत हद्दीत एक मोठी दुर्घटना घडली आहे. पहाटेच्या सुमारास परिसरातील एक जुनी दोन मजली इमारत कोसळली. झालेल्या दुर्घटनेत एकाचा मृत्यु झाला आहे. अग्निशामक दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्याअसून ढिगाऱ्याखाली आणखी कोणी अडकले आहे का? याचा शोध घेणे सुरू आहे. (Latest Mumbai News)

मिळालेल्या अधिक माहितीनुसार, मुलचंद कंपाऊंड येथे पहाटेच्या सुमारास एक जुनी दोन मजली कारखाना असलेली इमारत कोसळली. यामध्ये माजिद अन्सारी वय 25 वर्ष या तरुणाचा मृत्यू झाला आहे. ही इमारत पुर्णता रिकामी होती. गेल्या वर्षी या इमरतीला आग लागली होती यामुळे येथे कोणी रहात नव्हते. तसेत कारखाना देखील बंद होता.

कारखान्याच्या इमारतीला लागूनच काही व्यापारी गाळे आहेत. याच गाळ्यात मजिद अन्सारी याचं एक कपड्याचं दुकान होतं. नेहमी प्रमाणे सर्व आवरून रात्रीच्या वेळी काल तो दुकानातच झोपला होता. कालची रात्र ही त्याच्या आयुष्यातील शेवटची रात्र असेल याची त्याला काहीच कल्पना नव्हती.

Mumbai News
Bhivandi | भिवंडीच्या खंडू पाडात भीषण अग्नितांडव, अन्सारी मॅरेज हॉलमध्ये भीषण आग

दुकानात तो झोपला असताना पहाटेच्या सुमारास दोन मजली इमारत पत्त्यांसारखी खाली कोसळली. यातच त्याचा मृत्यू झाला घटनास्थळी अग्निशमन दलाचे जवान दाखल झाले होते. पोलिसांनी देखील घटनेची माहिती मिळताच याची चौकशी केली आहे. तसेच सध्या इमारतीचा मलबा उचलण्याचे काम सुरू आहे. सदर घटनेने पिरसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com