अभिजीत देशमुख, प्रतिनिधी...
Mumbai News: येत्या ६ मे रोजी मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांची रत्नागिरीत जाहीर सभा होणार आहे. या सभेची मनसेकडून जोरदार तयारी सुरू असतानाच ठाकरे गटाने मनसेला मोठा धक्का दिला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कल्याण डोंबिवली परिसरातील शहरसंघटक, शाखाप्रमुख विभाग प्रमुख व अनेक पदाधिकाऱ्यांनी आज ठाकरे गटात प्रवेश केला आहे. (Latest Marathi News)
याबाबत अधिक माहिती अशी की, गेल्या काही दिवसांपासून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) व मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यामधील जवळीक चांगलीच वाढल्याचे दिसत आहे. पाडवा मेळाव्यातही राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरेंवर सडकून टीका केली होती. त्यामुळेच ठाकरे गटाने शिवसेना शिंदे गटासह मनसेलाही लक्ष्य केल्याचे पाहायला मिळत आहे.
याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) कल्याण डोंबिवली परिसरातील शहरसंघटक, शाखाप्रमुख विभाग प्रमुख व अनेक पदाधिकाऱ्यांनी आज ठाकरे गटात प्रवेश केला. उद्धव ठाकरे (Udhav Thackeray) यांच्या उपस्थितीत मातोश्रीवर मनसे पदाधिकाऱ्यांनी शिवबंधन बांधले. या पक्ष प्रवेशाने रत्नागिरी सभेआधी राज ठाकरेंना मोठा धक्का दिल्याचे बोलले जात आहे.
भाजपचा ठाकरे गटाला धक्का...
एकीकडे मनसे पदाधिकाऱ्यांनी ठाकरे गटात प्रवेश केला असतानाच दुसरीकडे भाजपनेही ठाकरे गटाला मोठा धक्का दिला आहे. ठाकरे गटाचे मीरा भाईंदरच्या माजी नगरसेवकांनी भाजपमध्ये (BJP) प्रवेश केला. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश पार पडला. यावेळी बोलताना चंद्रशेखर बावनकुळे यांनी "शिल्लक सेनेतील एकएक जण भाजपमध्ये प्रवेश करत आहे," अशी खोचक टीका उद्धव ठाकरेंवर केली आहे. (Maharashtra Politics)
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.