Maharashtra Politics: विधानसभेच्या तोंडावर अजित पवारांना मोठा धक्का, OBC चा बडा नेता शरद पवार गटाच्या वाटेवर

Ajit Pawar And Sharad Pawar: अजित पवार गटाचे नेते आणि ओबीसीचे नेते ईश्वर बाळबुद्धे शरद पवार गटामध्ये प्रवेश करणार आहे. अजित पवार आणि छगन भुजबळ यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.
Maharashtra Politics: विधानसभेच्या तोंडावर अजित पवारांना मोठा धक्का, OBC चा बडा नेता शरद पवार गटाच्या वाटेवर
Ajit Pawar And Sharad PawarSaam Tv
Published On

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांना मोठा धक्का बसला आहे. ओबीसीचा बडा नेता अजित पवार गटाची साथ सोडणार असून लवकरच ते शरद पवार गटामध्ये प्रवेश करणार आहेत. छगन भुजबळ यांचे समर्थक आणि ओबीसी सेलचे अध्यक्ष ईश्वर बाळबुद्धे पुन्हा घरवापसी करणार आहेत. ते लवकरच शरद पवार गटामध्ये प्रवेश करणार आहेत. त्यामुळे विधानसभेपूर्वी अजित पवार आणि छगन भुजबळ यांच्यासाठी हा मोठा धक्का असल्याचे म्हटले जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अजित पवार गटाला शरद पवार गटाचा मोठा धक्का बसणार आहे. छगन भुजबळ यांचे समर्थक आणि ओबीसी सेलचे अध्यक्ष ईश्वर बाळबुद्धे उद्या शरद पवार गटामध्ये प्रवेश करणार आहेत. शरद पवार, जयंत पाटील यांच्या उपस्थितीत ते राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात प्रवेश करणार आहेत. ओबीसींना न्याय मिळत नसल्याची भावना घेऊन ओबीसी पदाधिकारी पवारांच्या गटात परतणार असल्याची माहिती समोर आली आहे.

Maharashtra Politics: विधानसभेच्या तोंडावर अजित पवारांना मोठा धक्का, OBC चा बडा नेता शरद पवार गटाच्या वाटेवर
Maharashtra Politics: महाराष्ट्रात येणार महिलाराज? सुप्रिया सुळे, रश्मी ठाकरे मुख्यमंत्री होणार? गायकवाडांचं वक्तव्य, राजकारण तापलं

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com