Maharashtra Political News : CM शिंदे - राहुल नार्वेकर यांच्यात 'वर्षा'वर बंद दाराआड चर्चा; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

CM Eknath Shinde-Rahul Narvekar : दोन्ही नेत्यांमध्ये नेमकी काय चर्चा झाली, याबाबत सर्वांनाचा उत्सुकता आहे.
Eknath Shinde-Rahul Narvekar
Eknath Shinde-Rahul NarvekarSaam TV
Published On

Mumbai News :

शिवसेना आमदार अपात्रेतेच्या सुनावणीदरम्यान 'वर्षा'वर बुधवार मोठी घडमोड घडली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यात बंद दाराआड चर्चा झाल्याची माहिती आहे. दोन्ही नेत्यांमधील या भेटीनंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. (Latest Marathi News)

बुधवारी विधानसभा अध्यक्ष अचानक वर्षा बंगल्यावर दाखल झाले होते. तेथे दोन्ही नेत्यांमध्ये जवळपास अर्धा तास चर्चा झाली. दोघांमधील चर्चा अत्यंत महत्त्वाची आणि गुप्त होती. कारण ज्यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये बैठक होती त्यावेळी सुरक्षारक्षकांपासून इतर स्टाफ सर्वांना तिथे प्रवेश नाकारण्यात आला होता. त्यामुळे दोन्ही नेत्यांमध्ये नेमकी काय चर्चा झाली, याबाबत सर्वांनाचा उत्सुकता आहे.

Eknath Shinde-Rahul Narvekar
NCP Political News : बारामतीत सुप्रिया सुळेंना सुनेत्रा पवार आव्हान देणार? वारजे भागातील बॅनरमुळे पुन्हा राजकीय चर्चांना उधाण

राहुल नार्वेकर भेटीनंतर बाहेर आले त्यावेळी पत्रकांरांनी त्यांना या भेटीबाबत विचारलं. त्यावेळी त्यांनी मतदारसंघातील कामानिमित्त ही भेट घेतल्याचं सांगितलं. मात्र या भेटीच्या टायमिंगमुळे चर्चा सुरु झाल्या आहेत. (Political News)

एकीकडे आमदार अपात्रतेची सुनावणी आहे, तर दुसरीकडे दोन्ही नेत्यांची भेट झाली. त्यामुळे सुप्रीम कोर्टाने खडेबोल सुनावल्यानंतर आता विधानसभा अध्यक्ष काय निर्णय घेतात याकडे, सर्वांचं लक्ष आहे.

Eknath Shinde-Rahul Narvekar
Political news : 'सुप्रिया सुळेंना हमासकडून लढण्यासाठी पाठवा'; शरद पवारांच्या इस्राइल-हमास युद्धाबाबतच्या वक्तव्यावरुन भाजप नेते आक्रमक

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना सुप्रीम कोर्टाने सुधारित वेळापत्रक सादर करण्यासाठी ३० ऑक्टोबरपर्यंतची वेळ दिली आहे. ३० ऑक्टोबर रोजी सुप्रीम कोर्टात पुन्हा सुनावणी आहे. जर विधानसभा अध्यक्षांनी सादर केलेले वेळापत्रक समाधाकारक नसल्यास सुप्रीम कोर्ट याबाबत निर्णय घेणार आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि विधानसभा अध्यक्ष यांच्यात झालेली भेट महत्त्वाची मानली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com