Maharashtra Kesari : सिकंदरविरोधात ४ गुण देणाऱ्या पंचाला धमकी; पोलिस कर्मचाऱ्याविरोधात अजामीनपात्र गुन्हा

धमकी देणाऱ्या व्यक्तीविरोधात पुणे पोलिसांनी अजामीनपात्र गुन्हा दाखल केला आहे
Maharashtra Kesari Sikandar Shaikh News
Maharashtra Kesari Sikandar Shaikh NewsSaam TV

पुणे : महाराष्ट्र केसरी स्पर्धेतील पंच मारुती सातव यांना धमकी देण्यात आल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आला आहे. मुंबई पोलीस दलातील एका पोलीस कर्मचाऱ्याने हा फोन केल्याचा आरोप सातव यांच्याकडून करण्यात आला. याप्रकरणी धमकी देणाऱ्या व्यक्तीविरोधात पुणे पोलिसांनी अजामीनपात्र गुन्हा दाखल केला आहे. (Latest Marathi News)

Maharashtra Kesari Sikandar Shaikh News
Jalna News : आमदार गोरंट्याल यांचा खोतकर, झोल कुटुंबीयांवर गंभीर आरोप; थेट मोक्का लावण्याची केली मागणी

संग्राम कांबळे असं गुन्हा दाखल करण्यात आलेल्या पोलिस कर्मचाऱ्याचं नाव आहे. पुण्यातील विमानतळ पोलिसांनी (Pune Police) हा गुन्हा दाखल केला आहे. पंच मारूती सातव यांनी आज (सोमवार) दुपारीच कांबळे यांच्याविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली होती.

काय आहे प्रकरण?

नुकताच पुण्यात महाराष्ट्र केसरी स्पर्धेचा थरार पार पडला. या स्पर्धेच्या सेमीफायनल सामन्यात माती विभागातील मल्ल सिकंदर शेक आणि पुण्याचा महेंद्र गायकवाड यांच्यात कुस्तीचा आखाडा रंगला. सिकंदर शेख हा महाराष्ट्र केसरी स्पर्धेत वरचढ म्हणून ओळखला जात होता. मात्र, महेंद्र गायकवाड याने सेमीफायनल सामन्यांच्या दुसऱ्या फेरीत डाव टाकत ५-४ अशी विजयी आघाडी घेतली. (Maharashtra Kesari)

Maharashtra Kesari Sikandar Shaikh News
Navneet Rana News : 'मी तुरुंगात १५-१६ तास हनुमान चालीसा पठण करायची म्हणून ठाकरे सरकार कोसळलं'

यावेळी सिकंदर शेख आणि महेंद्र गायकवाड यांच्या लढतीमधील पंचांनी दिलेल्या ४ गुणांचा वाद निर्माण झाला आहे. पंचांनी ४ गुण दिल्यानं सिकंदर शेखवर अन्याय झाल्याच्या चर्चा सोशल मीडियावर सुरु झाल्या. दरम्यान, मुंबई पोलीस दलातील कर्मचारी संग्राम कांबळे याने सेमीफायनल सामन्यांतील पंच मारुती सातव यांना फोनवरून धमकी दिली.

यासंदर्भात ऑडिओ क्लिप सुद्धा व्हायरल झाली. त्यामध्ये संग्राम कांबळे यांनी मारुती सातव यांना तुम्हाला मुलगा आहे की मुलगी असं सांगा विचारलं. मारुती सातव यांनी मुलगा आहे, असं सांगितल्यावर कांबळे यांनी मुलाच्या डोक्यावर हात ठेवून शपथ घेऊन सांगा तुम्ही दिलेला निर्णय योग्य होता का सांगा, असं म्हटलं. कांबळे यांनी सातव यांनी दबावात निर्णय घेतल्याचं म्हटलं. यावर मारुती सातव यांच्याकडून चुकीचा निर्णय घेतला नसल्याचं सांगण्यात आलं. त्यावर कांबळे यांनी सातव यांना सगळ्या गोष्टी तपासून निर्णय घ्यायला हवा होता, असं म्हटलं आहे.

Edited By - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com