आरोग्य विभागाचा मोठा निर्णय; भरती गोंधळानंतर 'या' गटाच्या परीक्षा केल्या रद्द

परीक्षा भरतीमधील गोंधळानंतर आरोग्य विभागाकडून (Health Department) मोठा निर्णय घेण्यात आला आहे. आरोग्य विभागाचा क आणि ड वर्गाची परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत.
health department exam
health department exam Saam Tv
Published On

मुंबई : परीक्षा भरतीमधील गोंधळानंतर आरोग्य विभागाकडून (Health Department) मोठा निर्णय घेण्यात आला आहे. आरोग्य विभागाचा क आणि ड वर्गाची परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत. तसेच 'क' आणि 'ड' गटाच्या उर्वरित ५० टक्के परीक्षा देखील रद्द करण्यात आल्या आहेत. अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांना पुन्हा परीक्षा अर्ज करावा लागणार नाही. जे परीक्षार्थी नव्याने अर्ज करतील त्यांना परीक्षा फी पुन्हा भरून अर्ज करावे लागतील. २ महिन्याच्या आत छाननी संपवावी अशा सूचना करण्यात आल्या आहेत. ( Maharashtra Health Department News In Marathi )

health department exam
CM Uddhav Thackeray: बहुमत चाचणीआधीच उद्धव ठाकरे राजीनामा देण्याची शक्यता - सूत्र

सार्वजनिक आरोग्य विभागाअंतर्गत गट क आणि ड सर्वंगाच्या दिनांक २४ ऑक्टोबर २०२१ व दि. ३१ ऑक्टोबर २०२१ रोजी घेण्यात आलेल्या पदभरती परीक्षाप्रक्रिया रद्द करण्यास मान्यता देण्यात आली आहे. नव्याने घेण्यात येणाऱ्या परीक्षेसाठी देण्यात येणाऱ्या जाहिरातीमध्ये, या रद्द केलेल्या परीक्षेसाठी अर्ज केलेल्या पात्र उमेदवारांना पुन्हा अर्ज करण्याची आवश्यकता नसल्याचे नवीन परीक्षेच्या जाहिरीतीमध्ये स्पष्टपणे नमूद करावे लागणार आहे. याव्यतिरिक्त नवीन जाहिरातीनुसार, नवीन अर्ज करणाऱ्या सर्व उमेदवारांना विहित परीक्षाशुल्क व इतर अटी लागू राहतील, असे आरोग्य विभागांकडून जाहीर करण्यात आले आहे.

health department exam
मोठी बातमी! औरंगाबादच्या 'संभाजीनगर' आणि उस्मानाबादच्या 'धाराशिव' नामांतराला कॅबिनेटची मंजुरी

दरम्यान, महाविकास आघाडी सरकारने (MVA) आज, मंगळवारी अनेक मोठे निर्णय घेतले आहेत. औरंगाबाद शहराच्या "संभाजीनगर" नामकरणास मान्यता देण्यात आली आहे. त्यासोबतच उस्मानाबाद शहराच्या “धाराशीव" नामकरणास मान्यता देण्यात आली आहे. आज २९ जून २०२२ रोजी झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच कॅबिनेट मंत्रिमंडळाच्या बैठकीत नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे लोकनेते दि.बा.पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ या नामकरणास मान्यता मिळाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com