१४ तारखेला एका वाघाच्या डरकाळीमुळे सगळ्यांचे आवाज बंद होतील; शिवसेना खासदारांचं वक्तव्य

'उद्धव ठाकरे यांच सरकार बदनाम करू पाहणाऱ्यांना, कोल्हेकुई करणाऱ्यांना या महामेळव्यातून उत्तर देणार'
उद्धव ठाकरे
उद्धव ठाकरेSaam Tv
Published On

मुंबई : सध्या शिवसेनेला डीवचण्यासाठी भाजपने सोडलेले भुंकणारे आहेत, त्यांना जे काही भुंकायचाय ते भुंकूदेत पण १४ तारखेला एका वाघाचा आवाज असा निघणार त्या वाघाच्या आवाजाने, डरकाळीने सगळ्यांचे आवाज बंद होणार असल्याचं वक्तव्य शिवसेना खासदार विनायक राऊत (Vinayak Raut) यांनी माध्यमांशी बोलताना केलं.

तसंच यावेळी राऊत यांनी सांगितलं की, शिवसेनेचा (Shivsena) १४ मे रोजी BKC मध्ये महामेळावा होणार असून हा मेळावा जबरस्त ताकदीने करावा हा निर्धार आम्ही केला आहे. यासाठीच काल पुरुष आणि आज महिला पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली होती. तसंच सध्या शिवसेनेवर चारही बाजूने टीका होत आहे. काही हौशे नवशेही टीका करतायत. मनसेनेही आता भाजपची तळी उचलायला सुरुवात केलीय अशा परिस्थिती शिवसैनिकांच्या आग्रहास्तव पक्षप्रमुखांनी १४ मे रोजी BKC ग्राउंडवर शिवसंपर्क अभियानाची सुरुवात करण्यासाठी संध्याकाळी ६ वाजता महामेळावा आयोजित केला आला आहे.

हे देखील पाहा -

दरम्यान, उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच सरकार बदनाम करू पाहणाऱ्यांना, कोल्हेकुई करणाऱ्यांना या महामेळव्यातून उत्तर देणार आहे. संभाजीनगर शिवसेना शाखेचा वर्धापन दिन आठ जून रोजी असून तिथल्या शिवसैनिकांची अनेक वर्षांची इच्छा आहे. ८ जूनच्या वर्धापनदिनी उद्धव ठाकरेंनी तिथे यावं त्यामुळे त्यांची विनंती मान्य करून संभाजीनगरचा ८ जूनच्या वर्धापनाला महामेळावा आयोजत करण्यात आला असल्याचंही ते म्हणाले.

शिवसेनेचं शिवसंपर्क अभियानाची (Shivsampark Abhiyan) सुरुवात पूर्व विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र, मराठवड्यापासून झाली. आता दुसरा टप्पा २६ मे रोजी सुरू होईल पश्चिम महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र आणि कोकण या भागातील शिवसेनेचे जिल्हाप्रमुख, संपर्क प्रमुखांना त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी बैठक होणार असल्याची माहिती देखील त्यांनी यावेळी सांगितली.

नेहमी बैठक असते, मुख्यमंत्री खासदार आमदारांच्या बैठका घेत असतात. लोकसभेचे अधिवेशन झाल्यानंतर अशी बैठक घेत असतात. लोकसभेच अधिवेशन पूर्ण झालं त्या अनुषंगाने खासदारांचे प्रश्न आणि त्यावर मार्गदर्शन करण्यासाठी ही बैठक संध्याकाळी होणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com