Pune : महालक्ष्मी देवीला सोन्याची साडी परिधान; भक्तांची मोठी गर्दी

दोन वर्षानंतर निर्बंधमुक्त नवरात्र उत्सव होत असल्याने भाविक मोठ्या प्रमाणात यंदा नवरात्र उत्सव साजरा करत आहे.
Pune News
Pune NewsSaam Tv
Published On

पुणे - सारसबाग येथील श्री महालक्ष्मी मंदिर प्रशासनाच्या माध्यमातून दरवर्षी मंदिरातील (Temple) देवीच्या मूर्तीला तब्बल १६ किलो सोन्याची साडी परिधान केली जाते. विजयादशमीनिमित्त देवीला ही साडी परिधान करण्यात आली. दोन वर्षानंतर निर्बंधमुक्त नवरात्र उत्सव होत असल्याने भाविक मोठ्या प्रमाणात यंदा नवरात्र उत्सव साजरा करत आहे. (Pune Latest News)

Pune News
RSS Chief Mohan Bhagwat: संघटित हिंदू समाजाकडून धोका असल्याची अकारण भीती पसरवली जाते - मोहन भागवत

दक्षिण भारतातील कारागिरांनी २० वर्षांपूर्वी ही सोन्याची साडी साकारली आहे. सुमारे ६ महिने ही साडी तयार करण्याचे काम सुरु होते. देवीला एका भक्ताने ही साडी अर्पण केली आहे. ही साडी तब्बल १६ किलो वजनाची आहे. दसरा आणि लक्ष्मीपूजनाच्या दिवशी ही साडी देवीला नेसविण्यात येते. त्यामुळे श्री महालक्ष्मी देवीचे हे सुवर्णवस्त्रातील रुप पाहण्याकरीता देवीभक्तांकडून गर्दी केली जाते.

आकर्षक नक्षीकाम करुन ही सोन्याची साडी साकारण्यात आली आहे. पुरातन काळापासून दसऱ्याच्या दिवशी सोने लुटण्याची परंपरा आहे आणि त्या परंपरेनुसार सोन्याच्या साडीत देवीच दर्शन व्हावे आणि त्यानिमित्ताने भक्तांना आशीर्वाद मिळावा, हे त्यामागील मुख्य कारण असल्याचे प्रमुख विश्वस्त अमिता अग्रवाल यांनी सांगितले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com