मुंबई : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थ्यांच्या निवडणुका कोरोनामुळे पुढे ढकलण्यात येणार असल्याची माहिती आहे. फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात होणाऱ्या निवडणुका या पुढे ढकलल्या जाणार आहेत. निवडणुकीसाठी राज्य निवडणूक आयोगाची तयारी आहे. पण, कोरोनाच्या तिसऱ्या लाटेमुळे या निवडणुका रखडणार आहेत. (Local body elections will be postponed due to Corona third wave)
ओबीसी (OBC) आरक्षणाशिवाय निवडणुका घेऊ नये, अशी राज्य सरकारची भूमिका आहे. मात्र, या निवडणुका आता पुढे ढकलण्यात येणार आहे. तसा ठराव राज्य सरकारने विधीमंडळात मांडला आहे. राज्यातील 15 महापालिकांच्या निवडणुका होणार होत्या.
हेही वाचा -
गेल्या वर्षीही काही महापालिकांच्या निवडणुका होणार होत्या. मात्र, कोरोनाची वाढती रुग्णसंख्या पाहाता त्या पुढे ढकलण्यात आल्या होत्या. यावर्षीही तीच परिस्थिती आहे. राज्यात कोरोनाची स्थिती भयंकर होत चालली आहे. संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढतोय. त्यामुळे या निवडणुका पुढे ढकलल्या जाणार आहेत.
महापालिका आणि जिल्हा परिषदांमधील जागांच्या संख्येत वाढ झाल्याने वॉर्ड रचनेचे काम निवडणूक आयोगाने सुरू केलं. तसेच, सुधारित आराखड्यानुसार आरक्षण निश्चितीसाठी प्रक्रिया सुरु केली आहे. एकीकडे, निवडणुका पुढे ढकलण्यावरुन राज्य निवडणूक आयोग आणि राज्य सरकारमध्ये मतभेद असताना निवडणूक आयोगाने ओबीसी आरक्षणाशिवाय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याची तयारी सुरू केली.
मात्र, राज्यात वाढत असलेल्या कोरोना रुग्णांचा आकडा लक्षात घेता राज्य सरकारची या निवडणुका पुढे ढकलण्याची तयारी आहे. कोरोनाच्या पहिल्या लाटेत 2020 मध्ये कोरोनामुळे राज्य सरकारने नवी मुंबई, कोल्हापूर, औरंगाबाद, वसई-विरार, कल्याण-डोंबवली या महापालिकांची निवडणूक पुढे ढकलली होती.
आता मार्च 2022 मध्ये मुदत संपत असलेल्या मुंबई, ठाणे, पुणे, पिंपरी-चिंचवड, नागपूर, नाशिक, उल्हासनगर, अमरावती, सोलापूर, अकोला या दहा महापालिका आणि 25 जिल्हा परिषदांच्या निवडणुका कोरोनाच्या तिसऱ्या लाटेमुळे पुढे ढकलल्या जाणार आहेत.
Edited By - Nupur Uppal
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.