Pune News: पुणेकरांनो! तांबडा पांढरा रस्सा विसरा, गणेशोत्सवासासाठी तीन दिवस मद्यविक्री बंद

Liquor Sale Ban In Pune: पुणेकरांनो! तांबडा पांढरा रस्सा विसरा, गणेशोत्सवासासाठी तीन दिवस मद्यविक्री बंद
Liquor sale closed for three days in Pune
Liquor sale closed for three days in PuneSaam TV
Published On

>> सचिन जाधव

Liquor Sale Ban In Pune:

पुणेकरांसाठी एका महत्वाची बातमी आहे. पुण्यात तीन दिवस मद्यविक्री बंद राहणार आहे. गणेशोत्सव कालावधीत शांतता सुव्यवस्था अबाधित ठेवण्याच्या दृष्टीने जिल्ह्यातील किरकोळ मद्यविक्रीच्या सर्व अनुज्ञप्ती १९ आणि २८ सप्टेंबर रोजी बंद राहतील.

Liquor sale closed for three days in Pune
Mumbai Aircraft Crash: मुंबई विमानतळावर खासगी विमान कोसळलं, खराब हवामानामुळे अपघात; व्हिडिओ आला समोर

तसेच २९ सप्टेंबर रोजी पुणे महानगरपालिका क्षेत्रात विसर्जन मिरवणूक संपेपर्यंत विसर्जन मिरवणुकीच्या मार्गावरील आणि गणेशोत्सवाच्या पाचव्या व सातव्या दिवशी गणपती विसर्जन असलेल्या क्षेत्रात मद्यविक्रीच्या अनुज्ञप्ती बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांनी दिले आहेत.  (Latest Marathi News)

पुणे जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्याच्या दृष्टीने महाराष्ट्र मद्य निषेध अधिनियम, १९४९ मधील नियम - १४२ अन्वये किरकोळ मद्यविक्रीच्या सर्व अनुज्ञप्ती बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

Liquor sale closed for three days in Pune
Wardha News: अत्यंत दुःखद; बैल पोळ्याच्या दिवशीच शेतकरी पिता-पुत्राचा तलावात बुडून मृत्यू

आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या अनुज्ञप्तीधारकाविरुद्ध महाराष्ट्र मद्य निषेध अधिनियम, १९४९ व त्याअंतर्गत असलेल्या नियमातील तरतुदीनुसार कडक कारवाई केली जाईल, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com