NCP : भुजबळांप्रमाणे खडसे देखील निर्दोष सुटतील; राष्ट्रवादी काँग्रेसचा दावा

राज्य सरकारच्या तिजोरीमध्ये पैसे आहेत, पण...
NCP Leaders
NCP LeadersSaamTV
Published On

नवी मुंबईत : एकनाथ खडसे Eknath Khadase आणि त्यांचे जावई निर्दोष आहेत याची आम्हाला खात्री आहे. छगन भुजबळाप्रमाणे (Chhagan Bhujbal) एकनाथ खडसेंना देखील अटक करण्याचा काही लोकांचा उद्देश दिसत आहे. मात्र छगन भुजबळाप्रमाणे एकनाथ खडसेसुद्धा निर्दोष सुटतील असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (NCP State President Jayant Patil) यांनी व्यक्त केला. ते नवी मुंबई येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांच्या आढावा बैठकीसाठी आले होते त्यावेळी त्यांनी वरील वक्तव्य केलं. (Like Bhujbal, Khadse will also be acquitted; NCP claims)

हे देखील पहा -

कोरोना काळात (Corona Period) केंद्र सरकारने (Central Goverment) कोणतीच मदत केली नाही सर्व मदत ही केंद्र सरकारनेच केली या देवेंद्र फडणवीसांच्या Devendra fadanvis वक्तव्याला जयंत पाटील यांनी उत्तर दिलं. तसेच देवेंद्र फडणवीस नांदेडमध्ये निवडणुका Nanded Elections असल्याने अशी वक्तव्य करत आहेत. राज्य सरकारने आपली जबाबदारी पूर्णपणे पार पाडली आहे. उलट केंद्र सरकारने पूर आणि अतिवृष्टीची Heavy rain मदत आणि निरक्षण करण्यासाठीची टीम ही उशिराने पाठवली असल्याचा आरोप जयंत पाटलांनी यावेळी केला.

राज्य सरकारची नियत नाही -

NCP Leaders
ऐन दिवाळीच्या तोंडावर ST प्रवास महागला; तब्बल 17.17 टक्के भाडेवाढ

राज्य सरकारच्या तिजोरीमध्ये पैसे आहेत, पण राज्य सरकारची मदत करण्याची नियत नाही. या सरकारने कोरोना काळात देखील मदत केली नाही. साधं राज्यातील लोक जगतायत की मरतायत यांची पर्वा त्यांनी केली नाही.राज्यातील आघाडी सरकार हे जनविरोधी आहे. यांनी मराठा, OBC सगळ्यांचं आरक्षण Reservation घालवलं असे अनेक आरोप आज त्यांनी नांदेड मधील देगलूर-बिलोली विधानसभा पोटनिवडणुकीच्या प्रचाराच्या सभेत केले आहेत.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com