अनिल देशमुखांप्रमाणे केंद्रीय यंत्रणांकडून मला देखील अडकवण्याचा प्रयत्न; मलिकांचा आरोप

केंद्रीय यंत्रणांकडून माझ्यावरती पाळत ठेवण्यात येत असल्याचा गंभीर आरोप
अनिल देशमुखांप्रमाणे केंद्रीय यंत्रणांकडून मला देखील अडकवण्याचा प्रयत्न; मलिकांचा आरोप
अनिल देशमुखांप्रमाणे केंद्रीय यंत्रणांकडून मला देखील अडकवण्याचा प्रयत्न; मलिकांचा आरोपSaamTv
Published On

वैदेही काणेकर

मुंबई : मंत्री नवाब मलिक Nawab Malik गेल्या काही दिवसांपासून अनेक प्रकरण बाहेर काढत आहेत. यांनी आपल्याला पत्रकार परिषद घेऊन केंद्रीय यंत्रणांवर खळबळजनक आरोप केले आहेत. मला माजी गृहमंत्री अनिल देखमुख यांच्या प्रमाणे अडकवण्याचा प्रयत्न सुरु आहे. तसेच मालिकांनी ट्विटरच्या माध्यमातून काल (ता. २६) दोन व्यक्तींचे फोटो पोस्ट करून ते लोक गेल्या काही दिवसांपासून या वाहनात बसून माझ्या घराची आणि शाळेची रेकी करत आहेत, असा आरोप केला आहे.

हवी असेल तर सर्व माहिती देईल;

नवाब मलिकांनी म्हंटल आहे की, जर कोणी त्यांना ओळखत असेल तर कृपया मला कळवा. या चित्रात जे आहेत त्यांना मी सांगू इच्छितो की तुम्हाला माझ्याबद्दल काही माहिती हवी असेल तर मी सर्व माहिती देईन.

माझ्या नातूंची देखील माहिती घेतली;

पुढे त्यांनी गंभीर आरोप केला आहे की, काही पक्षाचे कार्यकर्ते, आॅफिसची, शाळेची माहीती काढत होते तर, त्यांनी माझ्या नातूच्या शाळेची माहीती घेतली आहे. मी दुबईत असताना दोन लोक कॅमेरा घेऊन फोटो काढत होते, काहींनी त्यांना अडवलं तर ते एलटीटी स्थानकापर्यंत पळाले.

अनिल देशमुख यांच्या प्रमाणे मला देखील अडकवण्याचा प्रयत्न;

पुढे ते म्हणाले, काल दोन फोटो ट्विटर आणि फेसबूकवर टाकले, एकाची माहीती मिळाली, दोन महिने जे काही सुरू होतं तेयाची माहीती घेत होता, जे लोक चुकीचं करतात त्याबद्दल मी बोलत होतो, त्याची पार्श्वभुमी त्या प्रकरची आहे. तर मलिक म्हणाले, याबद्दल मलिक पोलिसांकडे, सीपीकडे तक्रार करणार आहेत. जिथे काही कागद काढायला जातो, जिथे डिपार्टमेंटला तक्रार करण्यास जातो हा व्यक्ती तिथे पोहोचतो.

माझी माहीती गुप्त पद्धतीने काढली जात आहे. ही हेरगिरी योग्य नाही याची तक्रार करणार करणार असल्याचे मलिक यांनी सांगितलं आहे. तर, अनिल देशमुख यांना अडकवण्याचा प्रयत्न झाला अगदी त्याचप्रमाणे मलाही अडकवण्याचा प्रयत्न होतो आहे असा गंभीर आरोप मलिकांनी केला आहे.

केंद्रीय यंत्रणांवर गंभीर आरोप;

पुढे त्यांनी केंद्रीय यंत्रणेवर आरोप करत म्हणाले, केंद्रीय अधिकारी स्वतः लोकांना मसुदा तयार करून देत आहेत, खोटी तक्रार करण्यास देत आहेत, माझ्या हाती पुरावे आहेत, याबद्दल मी पोलिस कमिशनर यांना तक्रार करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केलं आहे.

अमित शाह यांच्याकडे तक्रार करणार;

ते म्हणाले, राज्यातील एका मंत्र्याला अडकवण्याचा हा डाव आहे. मी अमित शाह यांना तक्रार करणार, काय कारवाई करणार हे पाहू. केंद्रीय यंत्रणा मला अडकवण्याचा प्रयत्न करत आहेत. तसेच या प्रकरणात मी आरटीआयमध्ये माहीती मागवणार आहे आणि यांचा राज्याच्या एका मंत्र्याला फ्रेम करण्याचा डाव आहे, असे गंभीर आरोप नवाब मलिक यांनी केले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com