पुणे शहर काँग्रेस मध्ये लेटर बॉम्बने उडवली खळबळ

एका नगरसेवकाने शहराध्यक्षांना लिहिलेल्या या पत्राने काँग्रेस मधील खदखद चव्हाट्यावर
पुणे शहर काँग्रेस मध्ये लेटर बॉम्बने उडवली खळबळ
पुणे शहर काँग्रेस मध्ये लेटर बॉम्बने उडवली खळबळSaam Tv
Published On

पुणे शहर काँग्रेसमध्ये Congress पुन्हा एकदा एका लेटर बॉम्बने Letter Bomb खळबळ उडाली आहे. प्रदेश पातळीवर काम करणारे जेष्ठ नेते भाजपला काँग्रेसच्या अंतर्गत गोटातील माहिती पुरवत असल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. पुणे लोकसभा मतदारसंघातील उमेदवारीची जागा राष्ट्रवादी काँग्रेसला NCP सोडण्याचे कसे षडयंत्र सुरु आहे, याबाबतची माहिती भाजपला पुरवली जात असल्याचा दावा केला आहे. एका नगरसेवकाने शहराध्यक्षांना लिहिलेल्या या पत्राने काँग्रेस मधील खदखद चव्हाट्यावर आली आहे.

नेमकं काय लिहलं आहे पत्रामध्ये ?

मा.शहराध्यक्ष,

पुणे शहर कॉंग्रेस

महोदय.. दिनांक 4/9/2021 रोजी सायंकाळी आपण कॉंग्रेस भवन येथे आगामी मनपा निवडणुका व बूथ कमीटी नियोजन याबाबत महत्त्वाची बैठक आयोजित केली होती.  परंतु वैयक्तिक कारणास्तव आपण बैठकी वेळा उपस्थित नव्हता. आपल्या अनुपस्थितीत काही इसमांनी सदर बैठक कामकाज पुढे सुरू करण्याचा प्रयत्न केला. सदर व्यक्ति अंतर्गत रित्या भाजपशी जवळीक ठेवुन पक्ष विरोधी कृत्य करत असल्याच्या पाश्र्वभूमीवर अनेक नगरसेवकांनी बैठकीकडे पाठ फिरवली. ज्यांच्या काँग्रेस पक्षा प्रति विश्वासार्हता आणि निष्ठा याबाबत सामान्य कार्यकर्ता देखील कायम प्रश्नचिन्ह उपस्थित करतो अशांना आपल्या अनुपस्थितीत महत्त्वाची बैठक आयोजित करण्याची सूत्रे देणे ही आक्षेपार्ह बाब आहे. 

अश्या बैठकीतील महत्त्वाची गोपनीय माहिती, प्रभागातील पडद्यामागील घडामोडी  या भाजपा कळवण्यात येतात व त्याचा उपयोग निवडणुका दरम्यान विरोधी पक्ष मोर्चेबांधणी करीता वापरतात असा अनेकांना पूर्वानूभव आहे. काँग्रेस पक्षाच्या पुरोगामी विचारसरणी वर  वर्षोनुवर्षे अल्पसंख्याक समाजाच्या मतांसाठी तुष्टीकरनाचा खोटा आरोप केला जातो. ही बाब राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व अन्य जातीय संघटना वर्षोनुवर्षे समाजात ठसविण्याचा राक्षसी प्रयत्न करत आहे.

पुणे शहर काँग्रेस मध्ये लेटर बॉम्बने उडवली खळबळ
Mumbai ; गेमच्या वादातून 16 वर्षीय मुलीची आत्महत्या

अनेक इतर समाज पक्षापासून काही प्रमाणात दूर जात असल्याची वस्तुस्थिती आहे. गैरसमजाच्या धुक्यातून आता कुठे पक्ष सावरत असताना बेजबाबदार प्रवृत्तीला अल्पसंख्याक समाजातील कार्यकर्त्यांची बैठकीची सूत्रे देणे गैर आहे. सदर व्यक्तीने फेसबुक व इतर सोशल मीडिया वर बैठकीची छायाचित्रे प्रसिद्ध केलीत. यामुळे कॉंग्रेस निवडणुका साठी अल्पसंख्याक समाजाला प्राधान्याने विचारात घेते असा पक्षास हानिकारक संदेश निवडणुकीच्या तोंडावर बहुजन समाजात पसरतो. ही बाब षढयंत्राचा भाग असून दुर्दैवाने आपण यास बळी पडत आहात.

ज्यांनी कॉंग्रेस पक्षाचा हक्काचा परंपरागत पुणे लोकसभा मतदारसंघराष्ट्रवादी कडे बहाल करण्याची सुपारी घेवून प्रत्यक्ष परिस्थिती बनवण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत अशांना बाजूला सारणे हे आत्यंतिक गरजेचे आहे . ज्यांच्या वर कोणत्याही सभासद अगर इच्छुक उमेदवार यांना काडीचा विश्वास नाही अश्या व्यक्तिंना महत्त्वाची बैठक आयोजित करण्याची सूत्रे देऊ नयेत. आपण उपस्थित नसल्यास बैठक पुढे ढकलावी पण पक्ष द्रोही व्यक्तिंना आपण पुन्हा पुन्हा आमच्यावर लादु नका.सदर पत्र गोपनीय असून पक्ष हिता करीता दिलेले असल्याने यांची गोपनीयता आपण बाळगताल अशी अपेक्षा बाळगतो. सोबत दिलेली छायाचित्रे ज्यात या पत्रातील तथ्य आपण पडताळून पाहताल अशी अपेक्षा बाळगतो.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com