"नेत्यांनी वक्तव्य करताना भान ठेवावं"- अजित पवार

निधीबाबत आम्ही आढावा घेत असतो
Ajit Pawar
Ajit PawarSaam Tv
Published On

ज्ञानेश्वर हिंगोलीकर

पुणे : राज्यामध्ये सध्या लोडशेडिंग (Load shedding) सुरू आहे. यासंदर्भात मुख्यमंत्र्यांशी चर्चा झाली आहे. देशपातळीवर कोळशाची सध्या टंचाई आहे. विविध राज्यामध्ये हवा तेवढा कोळशाचा (Coal) पुरवठा होत नाही. यामुळे परदेशामधून देखील कोळसा आयात करण्याचा निर्णय झाला आहे. शिवाय छत्तीसगडमधील खाणच घेण्याचा विचार राज्य सरकारकडून सुरू आहे. यासाठी ऊर्जामंत्री नितीन राऊत प्रयत्न करत आहेत. सोनिया गांधींनी (Sonia Gandhi) देखील यामध्ये छत्तीसगड (Chhattisgarh) राज्य सरकारला याविषयीची विनंती केली आहे, अशी माहिती अजित पवार (Ajit Pawar) यांनी दिली आहे. ते पुण्यात बोलत होते.

हे देखील पहा-

देशभर सध्या कोळशाचा तुटवडा आहे. यामुळे राज्यांना योग्य प्रमाणात त्याचा पुरवठा होत नाही. शिवाय रेल्वेमधून इतर जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक होत असते. याप्रश्नी कोणते देखील राजकारण करायचे नाही. मात्र, देशभर कोळसाटंचाई आहे, हे सत्य असल्याचे ते यावेळी सांगितले आहे. कोणत्याही राजकीय पक्षाच्या व्यक्तींनी मत व्यक्त करत असताना कुठल्या समाजाबद्दल, घटकाबद्दल अपमान होईल किंवा नाराजी वाढेल, असे न करता तारतम्य बाळगूनच वक्तव्ये केली पाहिजे, असे अजित पवार यांनी यावेळी म्हणाले आहे.

Ajit Pawar
रोहिणी न्यायालय परिसरात पोलीस कर्मचाऱ्यांकडून गोळीबार; २ जखमी

बदल्यांच्या संदर्भात मुख्यंमंत्री आणि गृहमंत्र्यांनी निर्णय घेतला आहे. बदल्या, पदोन्नती यासाठी समिती असते. ती निर्णय घेत असते. मात्र, तरीदेखील मुंबईला गेल्यावर यासंदर्भात माहिती घेणार असल्याचे ते म्हणाले आहेत. पीएमपीएमएल संपाविषयी मी आयुक्तांशी सकाळी बोललो आहे. दुपारपर्यंत त्यांचे पैसे जातील, अशी माहिती अजित पवार यांनी दिली आहे. पीएमपीएमएलकडे खासगी ठेकेदारांचे पैसे थकल्यामुळे हा बंद पुकारण्यात आला आहे. यामुळे सीएनजी आणि इलेक्ट्रिक बस डेपोत आहेत.

Edited By- Digambar Jadhav

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com