दरड कोसळल्याने दोघे गंभीर जखमी; सेना आमदारांची घटनास्थळी धाव

प्रातिनिधिक छायाचित्र
प्रातिनिधिक छायाचित्र
Published On

मुंबई : असल्फा भागातील asalfa area डाेंगराच्या तिस-या बाजूला उंची जास्त असल्याने सरंक्षक भिंत बांधता आली नाही परंतु त्या ठिकाणी भिंत बांधण्यासाठी प्रयत्नशिल राहू असे आश्वासन शिवसेनेचे आमदार दिलीप लांडे dilip lande यांनी रहिवाशांना दिले. या भागात रात्री डाेंगराचा काही भाग घरांवर काेसळल्याचे समजताच आमदार लांडे यांनी घटनास्थळी धाव घेतली हाेती.

सोमवारी रात्री असल्फा भागात डोंगराचा काही भाग landslide घरांवर आला. या घटनेत दाेन नागरिक गंभीररित्या जखमी झाले. तसेच पाच ते सहा झाेपड्यांचे नुकसान झाले आहे. ही घटना घडल्याचे समजताच बीएमसीचे कर्मचारी, अग्निशमन दलाचे जवान तसेच पाेलिस घटनास्थळी पाेहचले. येथील मातीचे ढिगारे हटविण्यास प्रारंभ केला.

प्रातिनिधिक छायाचित्र
...म्हणून नारायण राणे गुन्हे शाखेत हजर झाले नाही

या भागातील आमदार दिलीप लांडे यांनीही घटनेची माहिती समजताच घटनास्थळी धाव घेतली. ते म्हणाले जखमींना उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले आहे. दाेघे गंभीर जखमी आहेत. गतवर्षी डोंगराच्या दोन्ही बाजूंना संरक्षक भिंत बांधण्यात आली आहे. तिसऱ्या बाजूला डोंगराची उंची जास्त आहे. त्यामुळे तिथे संरक्षक भिंत बांधता आलली नाही परंतु तेथे भिंत बांधण्यासाठी प्रयत्नशिल राहू.

दरम्यान या घटनेत ज्यांच्या झाेपड्यांचे नुकसान झालेले आहे त्या कुटुंबाना तात्पूरत्या स्वरुपात नजीकच्या शाळेत स्थलांतरित करण्यात आले आहे. याबराेबरच जखमींवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com