मुंबई: भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या हे जरंडेश्वर साखर कारखान्यातील घोटाळ्याप्रकरणी शतकाऱ्यांचे एक पथक घेऊ ईडी कार्यालयात दाखल झाले. ईडी (enforcement directorate) चे एडिशनल डायरेक्टर सत्यप्रत कुमार यांची किरीट सोमय्या (Kirti somaiya) यांनी भेट घेतली. यावेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी उप-मुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्यावर निशाणा साधला आहे. ते म्हणाले की, अजित पवारांना कोर्टाने स्वतः उत्तर दिलं आहे. जर ते म्हणतात की जरंडेश्वर कारखाना (jarandeshwar sugar mills pvt. ltd) माझा नाही तर, हा कारखाना शेतकऱ्यांना परत देऊन आदर्श घडवा असं आवाहन सोमय्यांनी अजित पवारांना केलं आहे. (Kirit Somaiya visits ed office with farmers for jarandeshwar sugar mill case)
हे देखील पहा -
पुढे सोमय्या म्हणाले की, जरंडेश्वर कारखाना शेतकऱ्यांना परत देण्यासाठी पवार कुटुंबियांनी प्रयत्न करावे. तसेच आयएनएस विक्रांत प्रकरणी सोमय्या म्हणाले की, मला एफआयआरची कॉपी देत नव्हते. त्यातील आरोप हास्यास्पद होते. एका बातमीच्या आधारावर एफआयआर झाली. राऊतांनी एवढे आरोप केले हा अठरावा आरोप आहे, काय झालं या आरोपांचं? असा सवाल त्यांनी राऊतांना विचारला. तसेच आयएनएस विक्रांत प्रकरणी संजय राऊत दहा वर्षांनी आता आरोप करतायत, कारण त्यांची प्रॉपर्टी आता जप्त झाली असं सोमय्या म्हणाले आहेत. तसेच मला आणि माझा मुलगा नील सोमय्या यांना अटक करण्यासाठी हे सेक्शन लावण्यात आलं आहे, असा आरोप त्यांनी उद्धव ठाकरेंवर केला आहे.
जरंडेश्वर कारखान्याबाबत सोमय्यांची भूमिका -
"जरंडेश्वर सहकारी साखर कारखाना २७००० शेतकऱ्यांचा ताब्यात द्यावा" अशी मागणी भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी सक्तवसुली संचालनालय अर्थात ईडीकडे होती. ते म्हणाले होते की, अजित पवारांनी (Ajit Pawar) जरंडेश्वर सहकारी साखर कारखाना (Jarandeshwar Cooperative Sugar Factory) जो १२०० कोटींचा घोटाळा केला होता, ज्याची मालमत्ता ईडीने जप्त केली होती त्याला न्यायालयाने मान्यता दिली आहे. भारत सरकारने (Govt. Of India) आणि ईडीने हा जरंडेश्वर सहकारी साखर कारखाना पुन्हा २७००० शेतकऱ्यांचा ताब्यात द्यावा अशी मागणी केली होती.
नेमकं काय आहे प्रकरण?
ईडीने मागच्या वर्षी महाराष्ट्र राज्य को-ऑप बँक घोटाळा प्रकरणात सातारा येथील जरेंडेश्वर सहकारी साखर कारखान्याची जागा, इमारत आणि इतर बांधकाम जप्त केलं होतं. याबाबत ईडी आता न्यायालयाकडून मिळालेल्या जप्तीच्या कारवाईची ऑर्डर मिळण्याची वाट पहात आहे. ही ऑर्डर मिळताच ईडी जरंडेश्वर कारखाना ईडीच्या मालकी अखत्यारित आणण्याची प्रक्रिया सुरू करेल.
महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेत सुमारे 25 हजार कोटी रुपयांचा घोटाळा (Scam) झाला होता. याबाबत मुंबई पोलिसांच्या (Mumbai Police) आर्थिक गुन्हे शाखेने 22 ऑगस्ट 2019 रोजी हा गुन्हा दाखल केला होता. याचा तपास लाचलुचपत प्रतिबंधक कायद्याच्या अनुशंगानेही केला जात होता. याच गुन्ह्याच्या आधारावर ईडीने आपला गुन्हा दाखल केला करून तपास सुरू केला होता. तपासात जरंडेश्वर सहकारी साखर कारखान्याची 2010 सालात विक्री करण्यात आली होती. वेळी तो मूळ किंमतीच्या कमी किंमतीत विकण्यात आला होता. त्याचप्रमाणे त्याची योग्य कार्यपद्धतीने पाळण्यात आली नव्हती. याच काळात अजित पवार हे महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेच्या संचालक मंडळावर होते.
याच काळात हा कारखाना मेसर्स गुरू कमोडिटी सर्विसेस प्रा.लिमिटेडला विकण्यात आला. नंतर तात्काळ हा कारखाना जरंडेश्वर शुगर मिल प्रायव्हेट लिमिटेडला भाडे तत्वावर देण्यात आला. जरंडेश्वर शुगर मिल्स प्रायव्हेट लिमिटेडमध्ये मोठ्या प्रमाणात स्पार्कलिंग सोईल प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचा हिस्सा आहे. ही कंपनी अजित पवार आणि सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांच्या मालकीची आहे.
Edited By - Akshay Baisane
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.