मुंबई: मुंबई महापालिकेने (BMC) शिवसेना नेते संजय राऊत यांचे पार्टनर सुजित पाटकर यांच्या बरोबर कोविड सेंटरचा घोटाळा केला. आम्ही त्या संदर्भात तक्रार पोलीस प्रशासन पासून महापालिका प्रशासना पर्यंत केली परंतु दाद मिळाली नाही. म्हणून आज आम्ही मुंबईतील मॅजिस्ट्रेट कोर्टात याचिका केली आहे, पुढच्या आठवड्यात सुनावणी होणार असल्याचं किरीट सोमय्यांनी (Kirit Somaiya) सांगितले. सुजित पाटकर यांनी बोगस कंपन्यांच्या नावाने रेकॉर्ड तयार केले. पुणे महापालिकेने ब्लॅकलिस्ट केल्यानंतरसुद्धा या लाईफ लाईन कंपनीला कॉन्ट्रॅक्ट मिळाले अशी मााहिती किरीट सोमय्या यांनी दिली आहे.
आयपीसी कलम 304, 408, 409, 420, 425 अंतर्गत सुजित पाटकर आणि लाईफ लाईन हॉस्पिटल मॅनेजमेंट कारवाई करावी अशी मागणी याचिकेत करण्यात आली आहे. जम्बो कोविड सेंटरचे कॉन्ट्रॅक्ट अनुभवहीन कंपन्यांना देण्यात आले. उद्धव ठाकरे आणि त्यांच्या माफिया सेनेला फक्त पैसे कमावण्यात रस होता म्हणून आम्ही शांत होतो पण तो आता त्यांच्यावर फौजदारी कारवाई व्हावी अशी आमची मागणी असल्याचं किरीट सोमय्या म्हणाले आहेत.
संजय राऊत (Sanjay Raut) नौटंकी करतात बाप बेटा जेल जायेंगे असं म्हटले होतं तरी काही झालं नाही. मुंबई पोलिसांना सांगावं लागलं संजय राऊतची खोटी कम्प्लेंट होती. किरीट सोमय्यांनी काही गुन्हा केला नाही असे न्यायलायत सांगावे लागले. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचे घोटाळे बाहेर येत आहेत त्यामुळे लक्ष वळवण्यासाठी केंद्रीय यंत्रणावर दबाव वाढवण्यासाठी हे होत आहे. आता तर शिवसेनेचे प्रवक्ते मिळाल्यावरही प्रश्न उपस्थित करत आहेत. चतुर्वेदी यांना आदित्य ठाकरे यांनी कंपन्या बनवून दिल्या. यशवंत जाधवांची काय अवस्था आहे हे सर्वांना माहीत आहे. दोन वर्षात 37 इमारती आणि हजार गाळे घेतले असे सर्व आरोप किरीट सोमय्या यांनी केले आहेत.
Edited By: Pravin Dhamale
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.