मनसुख हिरेन यांच्या कुटुंबाची जबाबदारी राज्य सरकारने घ्यावी; किरीट सोमय्या यांची मागणी

भाजप नेते , माजी खासदार किरीट सोमय्या गेल्या काही दिवसांपासून सातत्यानं गैरव्यवहाराच्या आरोपावरून सत्ताधारी महाविकास आघाडी आणि शिवसेना नेत्यांवर जोरदार निशाणा साधत आहे.
Kirit somaiya
Kirit somaiya Saam Tv
Published On

सुशांत सावंत

मुंबई : भाजप नेते , माजी खासदार किरीट सोमय्या हे गेल्या काही दिवसांपासून सातत्यानं गैरव्यवहाराच्या आरोपावरून सत्ताधारी महाविकास आघाडी आणि शिवसेना नेत्यांवर जोरदार निशाणा साधत आहे. आज देखील सोमय्या यांनी मनसुख हिरेन हत्या प्रकरणावरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray ) यांच्यावर जोरदार टीका केली आहे. तसेच मनसुख हिरेन यांच्या कुटुंबाची जबाबदारी राज्य सरकारने घ्यायला हवी, अशी मागणी किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी केली आहे. (Kirit Somaiya Latest News In Marathi )

हे देखील पाहा -

किरीट सोमय्या म्हणाले, 'मनसुख हिरेन यांच्या हत्येची सुपारी देऊन केली याची जबाबदारी मुख्यमंत्री कधी घेणार आहे. मनसुख हिरेन यांच्या कुटुंबाची जबाबदारी राज्य सरकारने घ्यायला हवी. राज्य सरकारने अधिकाधिक मदत हिरेन यांच्या कुटुंबाला केली पाहिजे अशा आशयाचे पत्र मी मुख्य सचिवांना लिहिले आहे'.

दरम्यान, किरीट सोमय्या यांनी मंत्री अनिल परब यांच्या दापोली रिसॉर्ट प्रकरणावरून जोरदार निशाणा साधला. सोमय्या म्हणाले, 'अनिल परब यांना वाचवण्यासाठी आणखी कोणाचा मनसुख हिरेन होऊ नये यासाठी ठाकरे सरकार काय काळजी घेत आहे ?.राज्य सरकारने मान्य केले की जयराम देशपांडे यांच्यावर दबाव आणण्यात आला होता. दबाव आणून जमीन एनए केली गेली. जयराम देशपांडे यांचाही मनसुख हिरेन होऊ नये ही जबाबदारी उद्धव ठाकरे यांनी घ्यावी. विभास साठे यांनी अनिल परब यांना शेत जमीन म्हणून कब्जा दिला होता'.

Kirit somaiya
काँग्रेस महासचिवाचा थेट सोनिया गांधींकडे राजीनामा; राज्यसभा उमेदवारीवरुन नाराजी

' दापोलीतील हे रिसॉर्ट हे १६ हजार ६०० चौ. फूट आकाराचे आहे. दापोली रिसॉर्ट हे तीन भावांची कहाणी आहे.दापोली रिसॉर्ट प्रकरणात संजय कदम,सदानंद कदम आणि अनिल परब यांचा सहभाग आहे. आम्हाला भीती आहे की मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पोलीस या सर्व प्रकरणाची निपक्ष चौकशी करणार नाही. त्यामुळं हा तपास सीबीआयकडे द्यावा', अशी मागणी किरीट सोमय्या यांनी यावेळी केली आहे.

Edited By - Vishal Gangurde

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com