Rajya Sabha Election :देशमुख-मलिकांचा मतदानाचा अर्ज फेटाळला; किरीट सोमय्या म्हणाले...

दोघांनी सत्र न्यायालयात अर्ज केला असता त्यांनी हा अर्ज हा फेटाळला आहे. या राजकीय घडामोडीवर भाजप नेते , माजी खासदार किरीट सोमय्या यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
Maharashtra political news
Maharashtra political news Saam Tv

पुणे : राष्ट्रवादीचे नवाब मलिक(Nawab Malik) आणि अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांचा राज्यसभा निवडणुकीसाठी केलेला अर्ज फेटाळला आहे. राज्यसभा निवडणुकीसाठी अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांनी अर्ज केला होता. मात्र, या अर्जाला ईडीने(ED) विरोध केला होता. त्यामुळे या दोघांनी सत्र न्यायालयात अर्ज केला असता त्यांनी हा अर्ज हा फेटाळला आहे. या राजकीय घडामोडीवर भाजप(BJP) नेते , माजी खासदार किरीट सोमय्या (kirit somaiya) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ( Maharashtra Politics news In Marathi )

Maharashtra political news
Rajya Sabha Election: मोठी बातमी! राज्यसभा निवडणुकीआधी महाविकास आघाडीला मोठा झटका

अनिल देशमुख आणि नवाब मालिक यांना राज्यसभा निवडणूक मतदानाचा अधिकार नाकारून न्यायालयाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना बारावी चपराक लगावली आहे,अशी टीका भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केली आहे.भाजप नेते, माजी खासदार किरीट सोमय्या सध्या पुणे दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यावर असताना पत्रकारांशी संवाद साधत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका केली आहे.

किरीट सोमय्या पुढे म्हणाले, 'दाउदच्या एजंटला मंत्रिमंडळात ठेवणाऱ्या उद्धव ठाकरे सरकारला हायकोर्टाकडूनही दिलासा मिळणार नाही. मेधा सोमय्याने शिवडी कोर्टाने संजय राऊत विरोधात दाखल केलेली याचिका आज न्यायालयाने स्वीकारली आहे. त्यामुळे संजय राऊत यांना पुन्हा शंभर कोटीचा भ्रष्टाचार केल्याप्रकरणी न्यायालयात हजर राहावं लागणार आहे'.

'राज्यातील १२ कोटी जनतेने माझ्यावर महविकास आघाडी सरकारचा भ्रष्टाचार उघडकीस आणण्याची जबाबदारी टाकली आहे. त्यामुळे भाजपकडून मला राज्यसभा निवडणुकीची उमेदवारी मिळाली नाही,याची मला जराही खंत नाही, असे किरीट सोमय्या म्हणाले.

Maharashtra political news
शंभर कोटींच्या मानहानी दाव्याप्रकरणी संजय राऊतांना न्यायालयाचे समन्स; 'या' तारखेस हजर रहा!

...म्हणून वाढली महाविकास आघाडीची डोकेदुखी

दरम्यान, राज्यसभा निवडणुकीसाठी अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांचा अर्ज फेटाळल्याने महविकास आघाडीची डोकेदुखी वाढली आहे. देशमुख आणि मलिक हे दोघेही राज्यसभा निवडणुकीत मतदानाचा अधिकार बजावण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेऊ शकतात. मुंबई उच्च न्यायालयात तातडीच्या सुनावनीची मागणी करू शकतात. मात्र, इतक्या कमी वेळात सुनावणी होऊन निकालाची शक्यता कमी असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे महाविकास आघाडीची डोकेदुखी वाढल्याचे बोलले जात आहे.

Edited By - Vishal Gangurde

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com