मुंबई: गेल्या काही दिवसांपासून भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांच्यात आणि शिवसेनेची नेते खासदार संजय राऊत यांच्यात आरोप- प्रत्यारोपांच्या फायरी चालू आहेत. आज पुन्हा किरीट सोमय्या माध्यमांसमोर आले आणि संजय राऊत (Sanjay Raut), ठाकरे परिवारावरती गंभीर आरोप केले आहेत. अलिबागमधील कोर्लई गावात असलेल्या रश्मी ठाकरे यांच्या नावावरील संपत्तीबाबत किरीट सोमय्या यांनी आरोप केले आहेत. तिथे गैरव्यवहार झाल्याचा आरोप सोमय्यांनी केला आहे.
गैरव्यवहाराबाबत आम्ही तक्रार केलेली आहे आणि त्याचा पाठपुरावा करत असल्यातं सोमय्यांनी सांगितले आहे. आणि लवकरच ते कोर्लई गावात जाऊन तेथील सरपंचांची भेट घेणार आहे. सोमय्यांनी कोर्लई गावातील (Korlai, Alibaug) जमीनीच्या गैरव्यवहाराचे कागदपत्रही समोर आणले आहेत, आणि कोर्लई गावातील सरंपचांचा दावा खोटा असून आपल्याकडे त्याबद्दलचे पुरावे असल्याचं सोमय्या म्हणाले आहेत. (Kirit Somaiya Press Conference)
अलिबागच्या त्या १९ बंगल्यांचा कर रश्मी ठाकरे (Rashmi Thackerey) यांच्या नावाने भरला असल्याची माहिती आहे. ते बंगले ठाकरे कुटुंबीयाशी संबंधीत नव्हते तर कर का भरला? असा प्रश्न सोमय्यांनी उपस्थीत केला आहे. हे पुरावे सादर करत असताना त्यांनी रश्मी ठाकरे यांचे पार्टनर रवींद्र वायकर यांच्याशी संबंधीत पुरवे समोर आणले आहेत. संबंधीत बंगले असणाऱ्या ग्रामपंचायतीची माफी रश्मी ठाकरे यांनी मागितल्याचं ते म्हणाले आहेत.
छगन भूजबळांची बेनामी संपत्ती आयटीने जप्त केली, सांताक्रूझला मी गेलो, मिडीया सोबत होती, त्याबद्दल ऊद्धव ठाकरेंनी १४ फेब्रुवारीला मला नोटीस पाठवली, ठाकरे सरकारची ठोकशाही सुरू असल्याचा आरोप सोमय्यांनी केला आहे. सोमय्यांनी यावेळी त्यांना १२ जूलै २०२१ ला आलेल्या पत्राचा पुरावा दिला आहे. आणि ते पत्र रष्मी ठाकरेंनी आणि मनिषा वायकर लिहीलं आहे असा आरोप सोमय्यांनी केला आहे. माफीया सेनेची सिस्टम मारो, काटो आहे. परंतु मी थांबणार नाही असा असेही ते म्हणाले. येत्या काळात रश्मी ठाकरे यांच्या माफी मागितल्याचे पुरावे दाखवणार असल्याचंही सोमय्या म्हणाले.
Edited By: Pravin Dhamale
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.