सुशांत सावंत
मुंबई: राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांना 8 तासांच्या चौकशीनंतर ईडीने अटक केली आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंप आला आहे. महाविकास आघाडीसाठी हा मोठा झटका मानला जात आहे. काही महिन्यांत महाविकास आघाडीतील दुसरा बडा नेता ईडीच्या कोठडीत पोहोचला आहे. याआधी ईडीने महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना अटक केली होती. मलिकांच्या अटेकेनंतर आता विविध नेत्यांच्या प्रतिक्रिया येत आहेत. भाजपचे नेते किरीट सोमय्या यांचीही आता प्रतिक्रिया आली आहे. सोमय्या म्हणाले की
मलिकांच्या अटकेनंतर आता अनिल परब यांचे ब्लड प्रेशर वाढले असेल. दुसऱ्या महान प्रवक्त्याची काय अवस्था झाली असेल? आम्ही बाप बेटे आतमध्ये जायला तयार पण आधी उद्धव ठाकरे सरकारला उध्दस्त करायचे आहे. शरद पवार यांचे साथीदार आज जेलमध्ये गेले आहेत. आता राज्य घोटाळा मुक्तीच्या दिशेने जात आहे. शरद पवार यांना असे म्हणायचे आहे की 'झुकेंगे नही महाराष्ट्र लुटते रहेंगे' दहशतवाद्यांची समझोता केल्यानंतर आणखी काय करणार? असे गंभीर आरोप किरीट सोमय्या यांनी संजय राऊत, शरद पवार यांच्यावर केले आहेत.
दरम्यान मंत्री अनिल देखमुखांनी (Anil Deshmukh)गृहमंत्री पदाचा राजीनामा दिला होता. त्याचप्रकारे राष्ट्रवादीचे मंत्री मलिक यांनाही आज ईडीने अटक केली आहे, त्यामुळे आता मंत्री नवाब मलिक सुद्धा आपल्या पदाचा राजीनामा देणार का याकडे लक्ष लागलं आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, जलसंपदा मंत्री जयंत पाटील आपल्या पक्षाचा दौरा रद्द करून मुंबईच्या दिशेला निघणार आहेत अशी माहिती मिळत आहे. नवाब मलिकांना आता न्यायालयात हजर करण्यात आले आहे. पुढची सुनावणी सुरु आहे.
Edited By: Pravin Dhamale
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.