Breaking: NCB पंच किरण गोसावीला 8 नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी

फरसखानाच्या गुन्ह्यात किरण गोसावी ला अजून तीन दिवसाची पोलीस कोठडी मिळाली आहे.
Breaking: NCB पंच किरण गोसावीला 8 नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी
Breaking: NCB पंच किरण गोसावीला 8 नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडीSaam Tv

सागर आव्हाड

पुणे: आर्यन खान क्रूझ पार्टी प्रकरणापासून फरार असलेला NCB चा पंच किरण गोसावीला पुणे पोलिसांनी (ता. २८) रोजी अटक केली होती. याबद्दल पुणे पोलीस आयुक्त अभिनव गुप्ता यांनी पत्रकार परिषद घेत याबद्दल माहिती दिली होती कि, गोसावीला अटक ही 2018 मध्ये एक फसवणुकीची केस होती त्या प्रकरणी करण्यात आली आहे. आता याच प्रकरणी किरण गोसावीला आज कोर्टात हजार केलं असता, 8 तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

याआधी देखील किरण गोसावी याला न्यायालयाने आठ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली होती. मात्र, पुन्हा एकदा न्यायालयाने गोसावी याला तीन दिवसाची पोलिस कोठडी वाढवून दिली आहे. किरण गोसावी विरोधात पुण्यातील लष्कर आणि वानवडी पोलीस स्टेशन मध्ये आणखी दोन नवे गुन्हे दाखल झाले आहेत. मात्र, सध्या फक्त फरसखाना येथील फसवणूकीच्या गुन्ह्यातच  गोसावी याला तीन दिवसाची कोठडी वाढवून देण्यात आली आहे. गोसावी यांनी केलेल्या गुन्ह्यात आणखी काही आरोपी असण्याची शक्यता असल्याने त्याच्या तपास करण्यासाठी न्यायालयाने गोसावी याला  तीन दिवसाची पोलिस कोठडी वाढवून दिली. विशेष म्हणजे गोसावी याची सुनावणी आज कोर्टात बंद दाराआड करण्यात आली. न्यायाधीशाने कोर्टात फक्त किरण गोसावी, तपास पथकातील पोलिस अधिकारी, बचाव पक्ष  आणि फिर्यादी पक्षाचे वकील यांनाच सुनावणी दरम्यान उपस्थित राहण्याची परवानगी दिली होती.

किरण गोसावीला आज केलं कोर्टात हजर करण्यात आलं होत. पालघर पोलीस ताबा मागणार आहेत. 8 तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. फरसखानाच्या गुन्ह्यात किरण गोसावीला अजून तीन दिवसाची पोलीस कोठडी मिळाली आहे.

पुण्याच्या फरसखाना पोलीस स्टेशन मध्ये कोणता गुन्हा नोंद आहे?

2018 ला किरण गोसावी वर फसवणुकीच्या गुन्ह्यात फरार होता. 2019 मध्ये त्याला फरार घोषित केले होत. पुण्यातील कसबा पीठ परिसरातील चिन्मय देशमुख यांनी 29 मे 2018 रोजी किरण गोसावी विरुद्ध फरासखाना पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल केला होता.

'त्या' एफआयआरनुसार, गोसावी यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर हॉटेल मॅनेजमेंटच्या नोकरीची जाहिरात पोस्ट केली होती आणि याच कामासाठी देशमुख हे गोसावीच्या संपर्कात आला होता.

Breaking: NCB पंच किरण गोसावीला 8 नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी
किरण गोसावीची अटक नेमकी कोणत्या प्रकरणी?

गोसावीने चिन्मय देशमुख यांना मलेशियामध्ये नोकरी देण्याचे आश्वासन दिले आणि त्याबदल्यात त्यांच्या खात्यात 3.09 लाख रुपये ट्रान्सफर करण्यास सांगितले, असा आरोप आहे. मात्र किरण गोसावीने पैसे घेऊनसुद्धा चिन्मय देशमुख यांना काम मिळाले नाही. देशमुख यांनी पैसे मागितले असता त्यांनी पैसेही परत केले नाहीत. या प्रकरणी पोलिसांनी गोसावीवर गुन्हा दाखल केला होता. 13 ऑक्टोबर रोजी पुणे शहर पोलिसांनी किरण गोसावी यांच्या विरोधात लुकआउट नोटीस जारी केली होती जेणेकरून ते देश सोडून जाऊ नयेत. या महिन्यात 18 ऑक्टोबर रोजी पोलिसांनी शाहबानो कुरेशीला मुंबईतील गोवंडी येथील राहत्या घरातून अटक केली होती. बानो तेव्हा किरणची असिस्टंट होती. देशमुख यांचे पैसे बानोच्याच खात्यात गेल्याचे तपासात उघड झाले होते.

फसवणुकीच्या आणखी तीन गुन्ह्यांमध्ये किरण गोसावीचे नाव आहे. यापैकी 2007 मध्ये अंधेरी पोलिस ठाण्यात आणि 2015-2017 मध्ये ठाण्यातील कापूरबावडी पोलिस ठाण्यात दोन गुन्हे दाखल झाले आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com