Mumbai: लज्जास्पद! पतीला डांबून महिलेवर केला बलात्कार; आरोपीची पोलिसांनी धिंड काढली

परिसरात नागरिकांच्या मनामधून गुंडाविषयीची भीती कमी व्हावी, याकरिता पोलिसांनी आरोपीची धिंड काढली
Mumbai: लज्जास्पद! पतीला डांबून महिलेवर केला बलात्कार; आरोपीची पोलिसांनी धिंड काढली
Mumbai: लज्जास्पद! पतीला डांबून महिलेवर केला बलात्कार; आरोपीची पोलिसांनी धिंड काढलीSaam Tv

मुंबई: अनेक प्रकारचे गुन्हे करून परिसरात आपल्या नावाची दहशत निर्माण करणाऱ्या एका गावगुंडाला तुळींज (Tulinj Police) पोलिसांनी अद्दल घडवली आहे. परिसरात नागरिकांच्या मनामधून गुंडाविषयीची भीती कमी व्हावी, याकरिता पोलिसांनी (Police) त्याची धिंड काढली आहे. तुळींज पोलिसांनी संबंधित गावगुंडाच्या हातात हातकडी आणि साखळी बांधून त्याची तब्बल २ तास पायी धिंड काढली आहे. त्यांनी तुळींज पोलीस ठाण्यापासून त्याची दहशत असणाऱ्या परिसरामध्ये पायी फिरवले आहे. नागरिकाबरोबर गुंडगिरी करणाऱ्या गुन्हेगारांची गय केली जाणार नाही, असा इशारा देण्याकरिता पोलिसांनी कुख्यात गावगुंडाची धिंड काढल्याचे स्पष्टीकरण दिले आहे. (kept husband hostage sexual assualt his wife by goon mumbai crime)

हे देखील पहा-

मोनू रायडर असे तुळींज पोलिसांच्या (Police) ताब्यात असलेल्या आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी मोनू याने बळजबरीने घरात घुसून एका महिलेला (woman) आणि तिच्या पतीला बेदम मारहाण (Beating) केली होती. त्यानंतर आरोपी मोनूच्या काही साथीदारांनी पीडित महिलेच्या पतीला दुचाकीवर बसवून एका निर्जनी ठिकाणी घेऊन गेले होते. याठिकाणी आरोपींनी पीडितेच्या पतीला काही तास डांबून देखील ठेवले होते. दरम्यान नराधम मोनू रायडर याने महिलेला धमकावून तिच्यावर बलात्कार (sexual assualt) केला आहे.

एवढे नव्हे तर त्याने पीडित महिलेच्या शरीरावर अनेक ठिकाणी गंभीर जखमा देखील केले होते. बलात्कार केल्यावर आरोपीने घरात असलेली रक्कम देखील पळवून नेली होती. आरोपीच्या साथीदारांनी महिलेच्या पतीला आचोळे परिसरामध्ये तब्ब्ल २ तास ओलीस ठेवले होते. दुसऱ्या दिवशी पहाटे ४ वाजेच्या सुमारास महिलेच्या पतीची सुटका केली होती.

Mumbai: लज्जास्पद! पतीला डांबून महिलेवर केला बलात्कार; आरोपीची पोलिसांनी धिंड काढली
चिंतावाढली! Corona एकाचवेळी दोन लाटा? ओमायक्रॉनचं सर्वात नवं लक्षण आलं समोर

या धक्कादायक प्रकारानंतर पीडित महिलेने लगेच तुळींज पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती. पीडितेच्या तक्रारीवरून पोलिसांनी बलात्कार, अपहरण, दरोडा आणि मारहाणीचा गुन्हा दाखल करत आरोपी मोनू रायडरला मीरा रोड परिसरामधून अटक (Arrested) करण्यात आली आहे. विशेष म्हणजे आरोपी मोनू रायडरवर विविध पोलीस ठाण्यात खून, दरोडा, प्राणघातक हल्ला असे एकूण १६ गुन्हे दाखल आहेत. त्याची दहशत संपवण्याकरिता शनिवारी पोलिसांनी त्याला प्रगतीनगर परिसरातून धिंड काढली आहे.

Edited By- Digambar Jadhav

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com