चिंतावाढली! Corona एकाचवेळी दोन लाटा? ओमायक्रॉनचं सर्वात नवं लक्षण आलं समोर

हा व्हायरस वेगाने पसरत असल्याचा दावा ब्रिटनच्या आरोग्य संस्थेने केला आहे.
चिंतावाढली! Corona एकाचवेळी दोन लाटा? ओमायक्रॉनचं सर्वात नवं लक्षण आलं समोर
चिंतावाढली! Corona एकाचवेळी दोन लाटा? ओमायक्रॉनचं सर्वात नवं लक्षण आलं समोरSaam Tv

वृत्तसंस्था: ब्रिटनमध्ये ओमायक्रॉन (Omicron ) व्हेरिअंट मधून नवा व्हायरस तयार झाला आहे. आणि तो अतिशय वेगाने पसरत असल्याचा दावा ब्रिटनच्या (Britain) आरोग्य संस्थेने यावेळी केला आहे. ओमायक्रॉन (Omicron ) व्हेरिअंट मधून हा व्हायरस ब्रिटनच नाही तर युरोपमधील (Europe) देशाबरोबरच ४० देशांमध्ये पसरत असल्याची दाट शक्यता जात आहे. यामुळे जगात २ लाटा एकाचवेळी येण्याची भीती देखील तज्ज्ञांनी यावेळी व्यक्त केली आहे. नवा व्हेरिअंट (Variant) डेन्मार्कमध्ये देखील अतिशय वेगाने वाढत आहे. (new omicron variant 2 waves corona time 2 spreading rapidly)

हे देखील पहा-

देशात ओमायक्रॉनच्या BA.१ प्रकाराचे सर्वात जास्त रुग्ण आहेत. BA.१ हा Omicron चा मूळ प्रकार आहे, असे असले तरी देखील BA.२ देशात देखील सापडला आहे. आतापर्यंत हा नवा व्हायरस (Virus) ४० देशांमध्ये आढळला आहे. त्यापैकी काही नमुने डेन्मार्क, भारत(India) , यूके, स्वीडन आणि सिंगापूरमध्ये देखील सापडले आहेत. BA.२ सध्या देशात आहे. परंतु, येथील बहुतेक लोकांना BA.१ ची लागण झाली आहे.

स्टेटन सीरम इन्स्टिट्यूटचे (Staten Serum Institute) संशोधक अँडर्स फॉम्सगार्ड यांच्या मते, BA.१ ची लागण झालेल्या लोकांना BA.२ ची देखील लागण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. ज्या लोकांना ओमायक्रॉनची लागण झाली आहे. त्यांना परत दुसऱ्या व्हेरिअंटची बाधा होऊ शकते. असे झाले असले तरी दोन लाटा एकाचवेळी डोके वर काढू शकतात, असे तज्ज्ञांनी माहिती दिली आहे. ओमायक्रॉन मधील बदल जो त्याला डेल्टापासून वेगळे पाडत आहे, हा बदल ओमायक्रॉनच्या दुसऱ्या व्हेरिअंटमध्ये दिसत नाही. (new omicron variant 2 waves corona time 2 spreading rapidly)

चिंतावाढली! Corona एकाचवेळी दोन लाटा? ओमायक्रॉनचं सर्वात नवं लक्षण आलं समोर
Maitreya scam! बीड जिल्ह्यात जवळपास ४० हजार महिलांचे घर- संसार उध्वस्त होण्याच्या मार्गावर

त्यामुळे त्याला ओळखणे कठीण होऊन गेले आहे. डॉक्टरांनुसार हॉस्पिटलमध्ये दाखल झालेल्या रुग्णांमध्ये ओमायक्रॉनविषयी दोन्ही व्हेरिअंटमध्ये खास फरक आढळला नाही. रुग्णालयामध्ये दाखल होणाऱ्यांची संख्या वाढत नाही. अनेक तज्ज्ञांचे मतानुसार की RT-PCR चाचणी BA.२ चा नमुना पॉझिटिव्ह दाखवण्यात यशस्वी ठरली आहे. परंतु, या प्रकाराविषयी अद्याप अनेक गोष्टी उघड होणे बाकी राहिले आहे.

Edited By- Digambar Jadhav

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com