कासारसाई धरण शंभर टक्के भरले!

मावळ तालुक्यात कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे कसरसाई धरण आज १०० टक्के भरले असून शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
कासारसाई धरण शंभर टक्के भरले!
कासारसाई धरण शंभर टक्के भरले!दिलीप कांबळे
Published On

मावळ : राज्यासह पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात गेल्या आठवड्याभरापासून पावसाने चंगळच जोर धरला आहे. मावळ तालुक्यात गेल्या चार पाच दिवसांपासून कोसळत असलेल्या मुसळधार पावसाने मावळातील महत्वपूर्ण असलेले कासारसाई धरण पूर्ण क्षमतेने भरले आहे.

हे देखील पहा -

कासारसाई धरणाच्या तीनही दरवाज्यातून ५४०० क्युसेसने पाण्याचा विसर्ग सुरु आहे. कासारसाई धरणाचा एकूण पाणीसाठा १७.१५ दक्षलक्ष घनमीटर इतका असून सध्या धरणात १५.८३ दक्षलक्ष घनमीटर इतका पाणीसाठा आहे. आतापर्यंत धरणपरिसरात ४४२ मिलीलिटर पावसाची नोंद झाली आहे.

कासारसाई धरण शंभर टक्के भरले!
चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा शहर जलमय!

कासारसाई धरण भरल्यामुळे विशेषतः कासारसाई, कुसगाव, पाचाणे, नेरे, सांगावडे आदी गावातील हजारो एकर शेतीच्या पाण्याची व पाणीपुरवठा योजनेसाठी लागणाऱ्या पाण्याची चिंता मिटली असून शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com