Karuna Munde: माझ्या शापामुळेच महाविकास आघाडी सरकार पडलं, करुणा मुंडेंची टीका; धनंजय मुंडेंनाही दिलं आव्हान

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बरोबर म्हटलं होतं, धनंजय मुंडेंवर वारंवार 'करुणा' नाही. माझ्यासाठी ही मोठी लढाई आहे.
Karuna Munde , Sangamner
Karuna Munde , Sangamnersaam tv
Published On

मुंबई : माझ्या शापामुळेच महाविकास आघाडी सरकार पडले. हे सरकार परत येणारच नाही, अशी टीका करुणा मुंडे यांनी केली आहे. भाजप सरकारच योग्य आहे. एका बापाचे असाल तर मला बीडमध्ये निवडणुकीत हरवून दाखवा, असं आव्हानही करुणा मुंडे यांनी धनंजय मुंडेंना दिलं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बरोबर म्हटलं होतं, धनंजय मुंडेंवर वारंवार 'करुणा' नाही, असंही त्यांनी म्हटलं.

महिलाच्या सन्मानाच्या फक्त गोष्टी केल्या जातात. काल अब्दुल सत्तरांनी सुप्रिया सुळे यांच्याबद्दल वक्तव्य केलं. पण सुप्रिया सुळे एकच महिला आहेत का की त्यांच्यावर अन्याय झाला. सुषमा अंधारेंची फक्त गाडी अडवली त्यानंतर मोठं राजकारण झालं. मात्र महाविकास आघाडीने वेगळं काय केलं?

Karuna Munde , Sangamner
Nitin Gadkari News: केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी मागितली जाहीर माफी, ४०० कोटी खर्च केले तरी रस्त्याचे काम निकृष्ट

मला महाविकास आघाडीने का न्याय दिला नाही. मागील अनेक दिवसांपासून 16 महिला आझाद मैदान येथे आंदोलन करत आहेत. त्यांच्याबद्दल का सरकार पाऊल उचलत नाही. सरकारच्या चुकीमुळे त्यांचे आयुष्य उद्ध्वस्त झालं आहे. महाविकास आघाडी सरकारच्या काळात 106 एसटी कामगारांचे कुंकू पुसलं तेव्हा का नाही महाविकास आघाडीने काही केलं नाही, असा सवाल करुणा मुंडे यांनी विचारला.

Karuna Munde , Sangamner
दाऊदचा भारतावर पुन्हा हल्ल्याचा कट, NIAच्या चौकशीत खुलासा, मोठी रक्कम भारतात पाठवली

करुणा मुंडे पुढे म्हणाल्या की, सुप्रिया सुळे या राजकारणी आहेत म्हणून त्यांच्या मागे उभे राहिले. धनजंय मुंडे घटस्फोटासाठी माझावर दबाव टाकत होते. तेव्हा मी माध्यमांसमोर आली होते. तेव्हा मी महिला आयोगाकडे तक्रार केली आजपर्यंत त्याच्यावर काहीही केलेलं नाही. रुपाली चाकणकर यांना मी पत्र दिलेलं आहे. बघुया ते केव्हा कारवाई करतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com