Kalyan News: विहिरीत पोहण्यास गेलेल्या ११ वर्षीय मुलाचा पाण्यात बुडून मृत्यू

11-year-old boy drowned in well: शाळा सुटल्यानंतर विहिरीवर पोहण्यासाठी गेलेल्या एका ११ वर्षाच्या मुलाचा पाण्यात बुडून मृत्यू झालाय.
Kalyan News: विहिरीत पोहण्यास गेलेल्या 11 वर्षीय मुलाचा पाण्यात बुडून मृत्यू
11-year-old boy drowned in well

अभिजीत देशमुख, साम प्रतिनिधी

कल्याण पश्चिमेकडील रिंग रोड परिसरातील विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या एका ११ वर्षीय मुलाचा विहिरीच्या पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारच्या सायंकाळच्या सुमारास घडली. प्रथमेश वाळके, असं या मृत मुलाचं नाव आहे.

कल्याण पश्चिम वाडेघर परिसरात राहणारा प्रथमेश वाळके हा अभिनव विद्यामंदिर शाळेत सहावी इयत्ता शिकत होता. शुक्रवारी दुपारच्या सुमारास शाळा सुटल्यानंतर प्रथमेश घरी परतला नसल्याने प्रथमेशच्या कुटुंबीयांनी शोधाशोध सुरू केली. प्रथमेश बेपत्ता असल्याबाबत खडकपाडा पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्यात आली. प्रथमेशचा शोध सुरू असताना रात्रीच्या सुमारास कल्याण पश्चिमेकडील रिंग रोड परिसरातील एका ढाब्याच्या जवळ असलेल्या विहिरीच्या परिसरात शाळकरी मुलाच्या चपला व गणवेश सापडल्याची माहिती स्थानिकांनी खडकपाडा पोलिसांना दिली.

खडकपाडा पोलिसांसह अग्निशमन विभागाचे पथक घटनास्थळी दाखल झाले, हे कपडे व चप्पल प्रथमेशचेच असल्याची माहिती समोर आली. त्यानंतर शोध घेतला असता प्रथमेशचा मृतदेह विहिरीत आढळून आला. त्यानंतर प्रथमेशचा मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवण्यात आला.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com