कल्याण-कसारा भूसंपादनासाठी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांचा पुढाकार

कल्याण-कसारा दरम्यानच्या तिसऱ्या रेल्वेमार्गासाठी रखडलेले भूसंपादन पूर्ण होण्यासाठी केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री कपिल पाटील यांनी पुढाकार घेतला आहे.
कल्याण-कसारा भूसंपादनासाठी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांचा पुढाकार
कल्याण-कसारा भूसंपादनासाठी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांचा पुढाकारSaam TV

कल्याण : कल्याण-कसारा दरम्यानच्या तिसऱ्या रेल्वेमार्गासाठी रखडलेले भूसंपादन पूर्ण होण्यासाठी केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री कपिल पाटील यांनी पुढाकार घेतला आहे. बाधीत शेतकऱ्यांकडून जमिनीच्या वाढीव मोबदल्याचा आग्रह लक्षात घेऊन, रेडीरेकनर नुसार चार लाख रुपये गुंठा दराने झालेल्या जमीन व्यवहाराचा तपशील सादर करण्याच्या सुचना राज्यमंत्र्यांनी केल्या. याबाबतच्या पुराव्यानंतर संबंधित शेतकऱ्यांना जादा दर मिळणार असल्याची अपेक्षा आहे.

कल्याण-कसारा भूसंपादनासाठी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांचा पुढाकार
''चंद्रकांत पाटलांवर करमणूक कर लावावा''

कल्याण-कसारा रेल्वेमार्गाचे भूसंपादन, कांदळवन जाहीर करण्याबाबत शेतकऱ्यांच्या समस्या, बुलेट ट्रेनसाठी रखडलेले भूसंपादन, मुंबई-वडोदरा महामार्गाचे भूसंपादन आदींबाबत केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांनी नुकतीच जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेतली. त्यावेळी शेतकऱ्यांच्या हिताचा दृष्टीकोन बाळगून विकासाची कामे रखडणार नाहीत, याबाबत दक्षता घेण्याच्या सुचना राज्यमंत्र्यांनी दिल्या.

कल्याण-कसारा तिसऱ्या रेल्वेमार्गासाठी शहापूर तालुक्यातील काही भागात केवळ सव्वा लाख रुपये गुंठा हा शासकीय दर ठरविण्यात आला. तर या भागात एका खासगी कंपनीने तब्बल चार लाख रुपये गुंठा दराने जमीन खरेदी केल्याची बाब काही शेतकऱ्यांनी निदर्शनास आणून दिली. त्यावेळी राज्यमंत्री कपिल पाटील यांनी तत्काळ जादा दराने जमिनीच्या नोंदणी व्यवहाराचा तपशील देण्याची सुचना केली. याबाबत शेतकऱ्यांनी तपशील दिल्यावर या भागातील जमीन मोबदल्याचे वाढीव दर निश्चित करावेत, अशा सुचना राज्यमंत्री पाटील यांनी दिल्या.

Edited By: Pravin Dhamale

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com