Kalyan-Dombivli Water Cut: कल्याण-डोंबिवलीत पाणी कपात लागू! ऑगस्ट अखेरपर्यंत दर मंगळवारी पाणी पुरवठा राहणार बंद

Kalyan-Dombivli News: धरणातील उपलब्ध पाणी साठ्याचे नियोजन करण्यासाठी कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीत पाणी कपात लागू करण्यात आली आहे.
Kalyan-Dombivli Water Cut
Kalyan-Dombivli Water Cutsaam tv
Published On

>> अभिजीत देशमुख

Kalyan-Dombivli Water Cut: कल्याण-डोंबिवलीकरांसाठी अतिशय महत्वाची बातमी आहे. ऑगस्ट अखेरपर्यंत दर मंगळवारी शराचा पाणी पुरवठा बंद राहणार आहे. धरणातील पाणीसाठा ऑगस्ट महिन्याच्या अखेरपर्यंत पुराविण्याकरीता ३२ टक्के तूट आहे. ही तूट भरुन काढण्याकरीता ठाणे लघू पाटबंधारे विभागाने दिलेल्या आदेशानुसार उल्हास नदीतील पाणी नियोजनाकरीता पाणी कपात लागू करण्यात आली आहे.

धरणातील उपलब्ध पाणी साठ्याचे नियोजन करण्यासाठी कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीत पाणी कपात लागू करण्यात आली आहे. येत्या ९ मे पासून दर मंगळवारी पाणी पुरवठा २४ तास बंद राहणार आहे. सोमवारी रात्री १२ वाजल्यापासून मंगळवारी १२ वाजल्यापासून पाणी पुरवठा बंद ठेवला जाणार आहे.

Kalyan-Dombivli Water Cut
EXPLAINER: शरद पवार एक-दोन दिवसांत नेमका कोणता निर्णय घेऊ शकतात?

महापालिकेच्या बारावे, नेतिवली, मोहिली, टिटवाळा जलशुद्धीकरण कल्याण पूर्व पश्चिम, डोंबिवली पूर्व पश्चिम आणि कल्याण ग्रामीण भागातील पाणी पुरवठा बंद राहणार आहे. ही पाणी कपात दर मंगळवारी केली जाणार असून ऑगस्ट अखेरपर्यंत लागू राहणार आहे.ऑगस्ट अखेरपर्यंत दर मंगळवारी २४ तास पाणी पुरवठा बंद असेल. (Mumbai News)

Kalyan-Dombivli Water Cut
Women Police: महिला पोलिस सराईत गुन्हेगाराच्या प्रेमात पडली अन् अडकली; नेमकं काय घडलं?

उल्हास नदीतील उपलब्ध पाणी ऑगस्ट अखेरपर्यंत पुरविण्यासाठी नदीतील पाणी साठ्यात ३२ टक्के तुट येणार आहे. ही तूट भरून काढत ऑगस्ट अखेरपर्यंत पाणी पुरविणे शक्य व्हावे  यासाठी पाणी कपातीचा निर्णय घेण्याची जबाबदारी राज्याच्या नगरविकास विभागाने त्या त्या प्राधिकरणावर सोपविली होती. यानंतर कल्याण डोंबिवली महापालिका प्र्शासनाने हा निर्णय घेतला आहे. (Latest Marathi News)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com